जावयाचा खून! तिघांना जन्मठेप..

0
1421

प्रत्येकी ०५ हजार रु. द्रव्यदंडाची सुनावली शिक्षा.

धुळे -९/६/२३

विजय बन्सीलाल भील (वय वर्ष ३० रा. जुने भामपूर ता. शिरपूर जि. धुळे) याचा खून झाल्याची घटना घडली होती.
सदर खटल्यात आर.एच. मोहम्मद प्रमुख जिल्हा सत्र न्यायाधीश धुळे. यांनी भादवि कलम ३०२ मध्ये दोषी ठरवून गुह्यातील ०३ आरोपीतांना जन्मठेप व प्रत्येकी ०५ हजार रु. दंडाची शिक्षा सुनावली आहे.
दि. १२,०७,२०२० रोजी ०४ वाजेच्या सुमारास विजय बन्सीलाल भील याची पत्नी कविता विजय भील हिच्या सोबत घरघुती कारणावरून भांडण झाले होते,
या कारणावरून कविता हिने तिचे वडील ओंकार शंकर ठाकरे भाऊ अंबालाल ओंकार ठाकरे व ज्ञानेश्वर ओंकार ठाकरे सर्व (रा. जावदा ता. शहादा जि. नंदुरबार) यांना फोन करून कळविले असता, त्यांनी जुने भामपूर ता. शिरपूर येथे येऊन जावई विजय भील यास “तु आमनी पोरले मारस का तु मरी घ्या तरी चालीनं आम्ही जेल भोगी लिसूत” असे बोलत शिवीगाळ करीत त्याच्या छातीवर ज्ञानेश्वर ठाकरे याने मारून त्याचे हात पकडून ठेवले

हे सुध्दा वाचा:

मंदिरात क्रिती सेननचा किस… व्हिडिओ व्हायरल – MDTV NEWS

खळबळ : ओडिशामध्ये आणखी एक रेल्वे दुर्घटना.. – MDTV NEWS

ब्रेकिंग -उद्धव ठाकरेंना शिंदेंचा जबरदस्त झटका .. सेना भवनाला सुरुंग.. – MDTV NEWS

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

अंबालाल ठाकरे याने त्याचा गळा दाबून हाताबुक्यानी मारहाण करीत जीवे ठार मारले या बाबत विजय भील याचा भाऊ अजय बन्सीलाल भील (रा. जुने भामपूर ता. शिरपूर जि. धुळे) याने दिलेल्या तक्रारीवरून शिरपूर पो. स्टे. येथे गुरनं. १४४/२०२० भादवि. कलम ३०२,३२३,५०४,५०६,३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.
सदर गुन्ह्याचा तपास तत्कालीन पोलीस अधिकारी पोलीस निरीक्षक सचिन पाटील व त्यांचे रायटर पोहेकॉ/ललित पाटील, रवींद्र माळी, पोना/तुकाराम गवळी यांनी मिळून केला.
सदर गुन्हा तपासात आरोपी १) ओंकार ठाकरे वय ६२ २)अंबालाल ठाकरे वय ३२ ३) ज्ञानेश्वर ठाकरे वय २३ सर्व (रा. जावदा ता. शहादा जि. नंदुरबार) यांना अटक करून सदर गुन्ह्यांचा अतिशय कौशल्यपूर्ण तपास करून आरोपीतांविरुद्ध न्यायालयात मुदतीत दोषारोपपत्र दाखल केले.

हे सुध्दा वाचा:

मंदिरात क्रिती सेननचा किस… व्हिडिओ व्हायरल – MDTV NEWS

खळबळ : ओडिशामध्ये आणखी एक रेल्वे दुर्घटना.. – MDTV NEWS

ब्रेकिंग -उद्धव ठाकरेंना शिंदेंचा जबरदस्त झटका .. सेना भवनाला सुरुंग.. – MDTV NEWS

तसेच प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक अन्साराम आगरकर यांनी सदर खटल्याच्या तपासाच्यावेळी गणेश पाटील सरकारी पोलीस अभियोक्ता जिल्हा सत्र न्यायालय धुळे, तसेच पो.स्टे. पैरवी अधिकारी पोहेकॉ/ अजीज शेख यांच्या संपर्कात राहून सदर खटल्याचा तपास योग्यरित्या झाल्याने सदर खटल्यात आर.एच. मोहम्मद प्रमुख जिल्हा सत्र न्यायाधीश धुळे. यांनी सदर खटल्यातील आरोपीतांना भादवि. कलम ३०२ मध्ये दोषी ठरवून प्रत्येकी ५००० रु. द्रव्यदंडाची शिक्षा तसेच दंड न भरल्यास ३ महिने कैदेची शिक्षा सुनावली आहे.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक संजय बारकुंड, उप अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली होती
पोलीस निरीक्षक अन्साराम आगरकर शिरपूर शहर पो. स्टे. ,तत्कालीन पोलीस निरीक्षक सचिन पाटील , पोहेकॉ/ललित पाटील, पोहेकॉ / रवींद्र माळी ,पोना/ तुकाराम गवळी ,पोहेकॉ/ अजीज शेख यांचा या पथकात समावेश होता
राज जाधव ,शिरपूर तालुका प्रतिनिधी,बभळाज ..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here