धुळे -९/५/२३
व्हॉइस ऑफ मीडिया पत्रकार संघटनेचा पदाधिकारी व सदस्यांचा मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये कौटुंबिक स्नेह मेळावा धुळ्यात पार पडला आहे,
यावेळी या कार्यक्रमादरम्यान कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी संरक्षण राज्यमंत्री तथा खासदार सुभाष भामरे यांच्यासह धुळे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संजय बारकुंड तसेच व्हाईस ऑफ मीडिया संघटनेच्या राष्ट्रीय सचिव दिव्या यशवंत पाटील त्याचबरोबर खानदेशचे “तुना प्यार मा पागल व्हयना य” गाण्याचे सुप्रसिद्ध गीतकार जगदीश संधानशिव हे देखील या कार्यक्रमाच्या मान्यवरांमध्ये उपस्थित होते,
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा.
https://bit.ly/3UoK7E0
तसेच धुळ्यातील पद्मश्री टॉवर चे मालक व व्यावसायिक पराग अहिरराव हे देखील मान्यवरांमध्ये सहभागी असल्याचे बघावयास मिळाले आहे,
यावेळी मान्यवरांच्या हस्ते धुळे जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमधून कार्यक्रमात सहभागी झालेल्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्रकाचे वितरण करण्यात आले आहे,
त्यावेळी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली,
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व्हाईस ऑफ मीडियाचे जिल्हाध्यक्ष भूषण अहिरे यांनी सादर केले,
तसेच माजी संरक्षण राज्यमंत्री खासदार सुभाष भामरे यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षीय भाषण करीत सर्व पत्रकार बांधवांना संबोधित केले,
त्यांच्यासह धुळे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संजय बारकुंड यांनी देखील सर्व पत्रकार बांधवांना आपल्या भाषणाच्या माध्यमातून संबोधित केले,
यावेळी व्हाईस ऑफ मीडिया संघटनेच्या राष्ट्रीय सचिव दिव्या यशवंत पाटील यांनी व्हॉइस ऑफ मीडिया या संघटनेच्या सुरुवाती पासून तर आत्तापर्यंतच्या सर्व प्रवासा संदर्भात पत्रकार बांधवांसह मान्यवरांना महत्त्वपूर्ण माहिती दिली,
त्याचबरोबर पत्रकारांच्या सर्वांगीण विकासासाठी व्हॉइस ऑफ मीडिया ही संघटना कशा पद्धतीने धडाडीने काम करीत आहे याचे देखील महत्त्व यावेळी दिव्या यशवंत पाटील यांनी पत्रकारांशी संबोधित करताना स्पष्ट केले आहे,
पत्रकारिता करत असताना पत्रकारांना येणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी त्याचबरोबर पत्रकारांना आवश्यक असलेल्या बाबी या पत्रकारांना मिळवून देण्यासाठी व्हाईस ऑफ मीडिया ही संघटना कार्यरत असून धुळे जिल्ह्यात देखील संघटनेशी जोडलेल्या सर्व पत्रकारांना तसेच इतर सर्व पत्रकारांसाठी महत्त्वाचा असलेला प्रश्न म्हणजे पत्रकारांना स्वतःचे घर मिळवून देणे, याबाबत दिव्या यशवंत पाटील यांनी आपल्या भाषणादरम्यान माजी संरक्षण राज्यमंत्री तथा खासदार सुभाष भामरे यांच्याकडे पत्रकारांना घर मिळवून देण्याची मागणी केली,
यावेळी दिव्या यशवंत पाटील यांच्या मागणीचा सन्मान करत खासदार सुभाष भामरे यांनी याबाबत सकारात्मक भूमिका दर्शवत या मागणी संदर्भात लवकरात लवकर ठराव पास करण्याचे देखील आश्वासन पत्रकारांना दिले आहे..
यावेळी या कार्यक्रमामध्ये मोठ्या संख्येने जिल्ह्यातील विविध तालुक्यांमधून या कार्यक्रमासाठी सहपत्नीक पत्रकार बांधवांनी उपस्थिती दर्शविली आहे.
दिलीप साळुंखे ,एम डी टी व्ही न्यूज प्रतिनिधी ,धुळे