धुळे :- संयुक्त राष्ट्र संघाच्या महासभेने डिसेंबर १९८७ मध्ये पारित केलेल्या ठरावानुसार दरवर्षी २६ जून हा दिवस ड्रग अॅब्युज आणि बेकायदेशीर तस्करी विरुध्द आंतरराष्ट्रीय मादक द्रव्य पदार्थ विरोधी दिवस म्हणून घोषित केलेला आहे. त्यानुसार दरवर्षी २६ जून रोजी आंतरराष्ट्रीय मादक द्रव्य पदार्थ सेवन विरोधी दिन साजरा केला जातो.
भारत सरकारने अंमली पदार्थांच्या धोक्याविरूध्द लढण्यासाठी नशामुक्त भारत साठी संकल्प निश्चित केला आहे. त्याचे पालन करण्यासाठी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो ने दिनांक १२ ते २६ जून या कालावधीत नशामुक्त भारत पंधरवाडा जाहीर केला आहे. अंमली पदार्थांच्या दुष्परिणामाबाबत लोकांमध्ये जनजागृती निर्माण करणे हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे.
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
धुळे जिल्हास्तरावर १२ ते २६ जून २०२३ या कालावधीत नशामुक्त भारत पंधरवाडा साजरा करणेच्या अनुषंगाने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून १२ जून रोजी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, धुळे कार्यालयात नशामुक्त भारत पंधरवाडा कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रमात सर्व कर्मचाऱ्यांना अंमली पदार्थ विरोधी शपथ देण्यात आली व अंमली पदार्थांच्या दुष्परिणामाबाबत माहिती देण्यात आली.
हे सुध्दा वाचा
नंदुरबारात ९ वर्षात विकासाला गती : कोट्यवधींची कामे – MDTV NEWS
कामगारांना कामाच्या ठिकाणी मिळणार मध्यान्ह भोजन : पालकमंत्री डॉ.गावित – MDTV NEWS
“मोदी सरकारचे नऊ वर्ष” … तळोद्यात पदाधिकाऱ्यांनी दिला कामाचा आढावा – MDTV NEWS
याप्रसंगी समाज कल्याण कार्यालय व जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालयातील सर्व कर्मचारी, तालुका समन्वयक, समतादुत तसेच विविध महामंडळांचे कर्मचारी उपस्थित होते. अशी माहिती सहायक आयुक्त, समाज कल्याण, धुळे यांनी दिली आहे.
एमडी.टीव्ही. न्युज नंदुरबार.