Dhule – शेतकऱ्यांच्या विहिरीतून चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

0
1434
Dhule

Dhule : साक्री तालुक्यातील देगाव आणि मलांजन गावाच्या शिवारात शेतकऱ्यांच्या विहिरीतून जलपरी, कॉपर केबल चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास करून पिंपळनेर पोलिसांनी 5 जणांना अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सपोनी श्रीकृष्ण पारधी यांच्या नेतृत्वाखालील पथकाने पिंपळनेर बसस्थानका वरून पेट्रोलिंग करत असताना गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीवरून काकासट भिलाटी येथील किरण यादू सोनवणे यास संशयित म्हणून ताब्यात घेतले. त्याच्याकडे विचारपुस केल्यानंतर त्याने सदरचा गुन्हा कबूल केला. तसेच

:हेही वाचा:

किरण सोनवणे याने सांगितले की, त्याने त्याचा भाऊ विठ्ठल यादू सोनवणे, मित्र सुनिल वामन बागुल, संजय बाबुलाल आकले आणि दादा नवल्या माळी यांच्यासोबत मिळून हा गुन्हा केला. या सर्व आरोपींना अटक करण्यात आली आहे. अटक केलेल्या आरोपींकडून 40 हजार रुपये किमतीची सुमारे 4000 फूट कॉपर वायर, 30 हजार रुपये किमतीच्या 2 इलेक्ट्रिक मोटारी आणि 10 हजार रुपये किमतीची 1 जलपरी असा एकूण 80 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलिसांनी या गुन्ह्यात सहभागी असलेल्या इतर आरोपींचा शोध सुरू केला आहे.

Dhule

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक संजय बारकुंड, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी साजन सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनी. श्रीकृष्ण पारधी व शोध पथकातील भुषण शेवाळे,बी.एम.मालचे, विश्वेश हजारे, रविंद्र सुर्यवंशी,सोमनाथ पाटील,प्रविण धनगर, नरेंद्र माळी, पंकज वाघ यांनी केली आहे.

:हेही वाचा:

✍🏻 MD TV न्यूज धुळे तालुका प्रतिनिधी दिलीप साळुंखे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here