Dhule News : दाऊळ गावात दोंडाईचा कृषी महाविद्यालयातील कृषीकन्या दाखल…!

0
60

Dhule News : दोंडाईचा- शिंदखेडा तालुक्यातील दाऊळ येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी सलंग्न स्वोद्धारक विद्यार्थी संस्थेचे विकासरत्न सरकारसाहेब रावल कृषी महाविद्यालय दोंडाईचा ,तालुका शिंदखेडा ,जिल्हा धुळे येथील कृषि कन्या दाखल झाल्या.

ग्रामीण जागरूकता कार्यक्रमाअंतर्गत विविध नवीन तंत्रज्ञानाची माहिती, तसेच माती व पाणी परीक्षण, कीड व रोग यांचे एकात्मिक व्यवस्थापन, जनावरांचे संगोपन, आणि शेतकऱ्यांच्या शेती विषयक विविध समस्या व त्यावरील उपाय आदी विषयांचे सखोल विश्लेषण या कृषी कन्यांकडून करण्यात  येणार आहे.

‘एम.डी टीव्ही’ चं Facebook  Group जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

यामध्ये शितल कदम, स्नेहा वाघमोडे, दिव्या सैंदाणे, आकांक्षा चव्हाण या कृषीकन्यांनी संवाद साधला.

याप्दारसंगी दाऊळ गावाचे सरपंच कुणाल पवार व त्याचबरोबर ग्रामसेवक महेश सोनवणे यांनी उपस्थित राहूण विद्यार्थिनींचे स्वागत केले. त्याच बरोबर गावाचे ज्येष्ठ नागरिक ललित भामरे , विजय पाटील, नारायण पवार, प्रदीप पवार, शिवाजी माळी, सतीश माळी, कृष्णा माळी, नामदेव सैंदाणे, अंकुश पवार आदी उपस्थित होते…. 

कृषीकन्यांना कृषी महाविद्यालय दोंडाईचाचे प्राचार्य आर. ‌बी .राजपूत सर , कार्यक्रम समन्वय डॉ. विवेक चव्हाण सर, कार्यक्रम अधिकारी प्रा. आर. एस .साळुंके सर व प्रा.मीनाक्षी पान्हेरकर मॅडम  यांचे मार्गदर्शन लाभले.

समाधान ठाकरे दोंडाईचा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here