Dhule News : दोंडाईचा येथे लग्नासाठी आलेले 42 वर्षीय ईसम बेपत्ता 

0
196
dhule-news-came-to-dondaicha-for-marriage-went-missing

Dhule News – दोंडाईचा ( Dondaicha ) शहरात अग्रेसर भवन येथे नातेवाईकांच्या लग्नकार्यासाठी आलेल्या 42 वर्षीय भावेश अभिमन्यू मोरे हे दोंडाईचा येथून बेपत्ता झाल्याची घटना असून चांगलीच खळबळ उडाली आहे तसेच दोंडाईचा पोलीस ठाण्यात तक्रार देखील दाखल करण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की दोंडाईचा लग्न सोहळासाठी दोंडाईचा तालुका शिंदखेडा येथून कार्यक्रम आपटून दिनांक ४ जानेवारी सायंकाळी ५ वाजेला दुचाकी क्रमांक एम.एच१८/ बीबी९६९९ या मोटर सायकलने नंदुरबार येथे जाण्यासाठी निघाले परंतु त्यानंतर ते अद्यापही घरी परतलेले नाहीत.

dhule-news-came-to-dondaicha-for-marriage-went-missing

‘एम.डी टीव्ही’ चं Facebook  Group जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

‘एम.डी टीव्ही’ चं Telegram  Group जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

कुटुंबीयांनी नातेवाईकांच्या ठिकाणी विचारपुस केली असता ते मिळून आलेले नाही तसेच.विविध ठिकाणी शोध घेऊनही त्यांच्या विषयी माहिती मिळालेली नाही त्यांनी अंगात पिवळा आणि निळाई निळ्या पट्ट्याचा रंगाचा शर्ट घातलेला होता. कुटुंबीयांनी दोंडाईचा पोलीस ठाण्यात दिलेल्या माहितीनुसार हरवल्याची नोंद करण्यात आली असून या संदर्भात माहिती मिळाल्यास जवळचे पोलीस ठाणे किंवा या मोबाईल नंबर ७५०७९२७९३५,९३२७४५४७९३या क्रमांकावर संपर्क करून कळवावे असे आव्हान कुटुंबियानतर्फे करण्यात आलेले आहे.सदर तपास पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस टेस्ट कॉन्स्टेबल प्रदीप निंबाळे करीत आहेत.   

🏻 MD TV न्यूज धुळे तालुका प्रतिनिधी दिलीप साळुंखे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here