Dhule News : धुळे तालुक्यातील नेर येथे केंद्रांतर्गत सर्व जिल्हा परिषद शाळातील इयत्ता तिसरी ते पाचवी व सहावी ते आठवी अशा दोन गटात विद्यार्थ्यांच्या हिवाळी मैदानी क्रिडा स्पर्धा न्यू इंग्लिश स्कूल नेर येथे उत्साहात संपन्न झाले.
यावेळी स्पर्धेचे उद्घाटन धुळे पंचायत समिती नेर बीट शिक्षण विस्तार अधिकारी श्री संजीव विभांडीक,केंद्रप्रमुख श्री प्रेमानंद उपाचार्य,केंद्रातील मुख्याध्यापक व शिक्षक यांच्या उपस्थितीत झाले.
तसेच या स्पर्धेत १०० मी, २००मी, ४००मी धावणे, तसेच उंच उडी, लांब उडी खेळ प्रकार घेण्यात आले.
‘एम.डी टीव्ही’ चं Facebook Group जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
‘एम.डी टीव्ही’ चं Telegram Group जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
या स्पर्धेत जिल्हा परिषद शाळा नेर १,४,५, रायवट, बोधावस्ती,कानडामाना,महादेव वस्ती, शिरधाणे प्र.नेर,जुनेभदाणे, नवेभदाणे,महालकाळी, नूरनगर,भटाईदेवी, खंडलाय बु./खु.,गुलाबवाडी या शाळेतील विद्यार्थ्यांनी उत्सूर्तपणे सहभाग घेऊन यश मिळविले..केंद्र स्तरावरील प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांची तालुकास्तरीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे.लवकरच या स्पर्धेतून जिल्हास्तरासाठी विद्यार्थ्यांची निवड होणार आहे.
- Allu Arjun Arrested : अल्लू अर्जुनला थिएटरमध्ये झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणी अटक..!
- Dhule News : दाऊळ गावात दोंडाईचा कृषी महाविद्यालयातील कृषीकन्या दाखल…!
- Maharashtra Election 2024 Date : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांचे बिगुल अखेर वाजलं, ‘या’ तारखेला होणार मतदान…!
- LIVE TV
- Nandurbar News : ज.ग नटावदकर कनिष्ठ महाविद्यालयात अक्षय ऊर्जा दिन संपन्न…!
तसेच स्पर्धेला धुळे पंचायत समिती गटशिक्षणाधिकारी सुरेखा देवरे यांचे मार्गदर्शन लाभले.तसेच न्यू इंग्लिश स्कूल नेर चे मुख्याध्यापक श्री नवल पाटील यांनी या स्पर्धेसाठी शाळेचे क्रीडांगण, विद्यार्थ्यांना अल्पोपहार,प्रथमोपचार सुविधा, पाण्याची व्यवस्था उपलब्ध करून दिली.पंच म्हणून न्यू इंग्लिश स्कूल चे क्रिडा शिक्षक श्री शौकत जहांगीर यांनी काम पाहिले.केंद्रातील सर्व मुख्याध्यापक शिक्षक यांनी स्पर्धा यशस्वीतेसाठी प्रयत्न केले.
✍🏻 MD TV न्यूज धुळे तालुका प्रतिनिधी दिलीप साळुंखे