Dhule News – दोंडाईचा येथे दि.३१ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी ८ वाजेपासुन ते दिनांक – १ जानेवारी २०२४ रोजी सकाळी ९ वाजेपावेतो फिर्यादी वसीन ऐनुद्दीन खाटीक, वय ३३ वर्ष, व्यवसाय रिकामे बारदान खरेदी- विक्री, रा. गरीब नवाज कॉलनी दोंडाईचा, ता. शिंदखेडा, जि. धुळे यांचे भाऊ आशिक ऐनुद्दीन खाटीक हे घरी नसतांना घरातुन कोणीतरी अज्ञात चोरट्याने एल.ई.डी. टि.व्ही. शिलाई मशिन,

पाण्याची मोटार चोरी केल्याने दोंडाईचा पोलीस स्टेशनला तक्रार दिली होती. त्याअनुषंगाने दोंडाईचा पोलीस स्टेशनला गुरनं – ०९/२०२४ भादंवि क. ३८०,४५४,४५७ प्रमाणे दिनांक ०६/०१/२०२४ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर घटनेचे गांभिर्य लक्षात घेवुन दोंडाईचा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी श्रीराम पवार, पोलीस निरीक्षक यांचे मार्गदर्नाखाली शोध पथकात नेमणुकीस असलेले पोलीस उप-निरीक्षक, पी.पी सोनवणे, पोहेकॉ सुनिल रतीलाल महाजन, पोकॉ पी.व्ही. पवार, पोकॉ हिरालाल वना सुर्यवंशी, पोकॉ अनिल दादाभाई धनगर, पोकों गावीत यांचे पथकास अज्ञात चोराचा शोध घेण्याबाबत आदेशीत केल्याने पोलीस पथकाने दोंडाईचा शहरात गुप्त बातमीदारामार्फत माहीती काढुन आरोपी रोहीदास छगन कोळी, वय २२ वर्ष, रा. चैनी रोडी, दोंडाईचा, ता. शिंदखेडा, जि. धुळे. यास अटक करण्यात यश आले त्याचेकडुन चोरी केलेला मुद्देमाल हस्तगत केला.
‘एम.डी टीव्ही’ चं Facebook Group जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
‘एम.डी टीव्ही’ चं Telegram Group जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
त्यात १० हजार रुपये किंमतीचा एम.आ कंपनीचा ३२ इंची एल.ई.डी. टी.व्ही, ५ हजार रुपये किंमतीची अर्धा इंच हॉर्सपॉवरची ओरीएन्ट कंपनीची पोपटी रंगाची पाण्याची चालु स्थीतीत असलेली मोटार, ५ हजर रुपये किंमतीचे पैंथर कंपनीचे सिलाई मशीन चालु स्थीतीत असलेले, पत्रटी डब्यात १ हजार रुपयाची चिल्लर आणि त्या डब्यात ठेवलेले भाउ आशिक याचे लॅमिनेशन केलेले आधारकार्ड ,५००/- रुपये किंमतीचे हेअर स्टेटनर मशीन असा ऐकून २१,५००/- रुपये मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
- Allu Arjun Arrested : अल्लू अर्जुनला थिएटरमध्ये झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणी अटक..!
- Dhule News : दाऊळ गावात दोंडाईचा कृषी महाविद्यालयातील कृषीकन्या दाखल…!
- Maharashtra Election 2024 Date : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांचे बिगुल अखेर वाजलं, ‘या’ तारखेला होणार मतदान…!
- LIVE TV
- Nandurbar News : ज.ग नटावदकर कनिष्ठ महाविद्यालयात अक्षय ऊर्जा दिन संपन्न…!
गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पी.पी. सोनवणे, नेम – दोंडाईचा स्टेशन हे करीत आहेत. सदरची कामगीरी मा. पोलीस अधिक्षक श्रीकांत धिवरे, मा. अपर पोलीस अधिक्षक किशोर काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांचे मार्गदर्शनाखाली दोंडाईचा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक श्रीराम पवार, पोलीस उप-निरीक्षक, पी.पी. सोनवणे, पोहेकॉ सुनिल रतीलाल महाजन, पोकॉ पी.व्ही. पवार, पोका हिरालाल वना सुर्यवंशी, पोकॉ अनिल दादाभाई धनगर, गावीत यांनी केली आहे.
✍🏻 MD TV न्यूज धुळे तालुका प्रतिनिधी दिलीप साळुंखे