DHULE NEWS… ना. गिरीष महाजन यांची संवेदनशीलता…वासखेडी घटनेतील मृतांच्या वारसांना मिळणार वाढीव मदत

0
215

धुळे : धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे ग्रामविकास, पंचायतराज, वैद्यकीय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण मंत्री गिरीश महाजन आपल्या सेवाभावी वृत्तीमुळे सर्वत्र ओळखले जातात. त्यात दुर्धर आजाराने जर्जर रुग्ण असो की, रस्त्यावर अपघातात झालेला जखमी असो, ते संवेदनशीलपणे प्रत्येकाच्या मदतीला धावून जातात. त्यांचाच प्रयत्नामुळे वासखेडी (ता. साक्री) येथील मृतांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री सहायता निधीतून विशेष बाब म्हणून एक लाखाऐवजी पाच लाख रुपये मंजुरीचे निर्देश दिले आहेत.

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

हे सुध्दा वाचा

BREAKING NEWS… १८ आमदार परत येणार ; संजय राऊतांचा खळबळजनक दावा ! | MDTV NEWS

GOOD NEWS…शिंदखेड्याच्या “त्या” तरुणाला मुख्यमंत्रांकडून शाब्बासकी… ५ लाखाचे बक्षीस देऊन केला गौरव ! | MDTV NEWS

Nandurbar… समान नागरी कायदा : आदिवासी संघटना आक्रमक ,जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन | MDTV NEWS

धुळे जिल्ह्यातील वासखेडी (ता. साक्री, जि. धुळे ) येथील स्थानिक कारखान्यास १८ एप्रिल २०२३ रोजी आग लागून त्या ठिकाणी ५ महिलांचा होरपळून मृत्यु झाला होता. या घटनेत मृत पावलेल्या महिलांच्या कायदेशीर वारसांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीद्वारे प्रत्येकी १ लक्ष याप्रमाणे एकूण ५ लक्ष इतका निधी १८ मे, २०२३ रोजीच्या पत्रान्वये मंजूर करण्यात आला होता.

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

हे सुध्दा वाचा

BREAKING NEWS… १८ आमदार परत येणार ; संजय राऊतांचा खळबळजनक दावा ! | MDTV NEWS

GOOD NEWS…शिंदखेड्याच्या “त्या” तरुणाला मुख्यमंत्रांकडून शाब्बासकी… ५ लाखाचे बक्षीस देऊन केला गौरव ! | MDTV NEWS

Nandurbar… समान नागरी कायदा : आदिवासी संघटना आक्रमक ,जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन | MDTV NEWS

परंतू मृत पावलेल्या महिला या अत्यंत गरिब कुटुंबातील असून त्यांच्या घराचा चरितार्थ चालविण्यासाठी त्या कारखान्यात मजुरीने काम करीत होत्या. ही बाब पालकमंत्री श्री.महाजन यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निदर्शनास आणून दिली होती. याबाबत लोकप्रतिनिधी तसेच जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पालकमंत्र्यांना याबाबत सांगितले होते. याची दखल घेऊन पालकमंत्री श्री.महाजन यांनी याबाबत पत्रव्यवहार करून पाठपुरावा केला व याबाबत सहानुभूतीपूर्वक विचार होऊन या कुटुंबियांना प्रत्येकी ५ लक्ष इतका सहाय्यता निधी उपलब्ध करून देण्याची विनंती मुख्यमंत्र्यांना केली. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याची त्वरीत दखल घेवून विशेष बाब म्हणून मंजुरी देण्यासंदर्भात मुख्यमंत्री सहायता निधीचे सहसचिवाना सूचना दिल्या.

✍🏻 एमडी.टीव्ही.न्यूज ब्युरो मुंबई.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here