मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम होणार,भाविकांमध्ये उत्साह
Dhule News – साक्री तालुक्यातील म्हसदी येथील कुलस्वामिनी, कुलदैवत धनदाईदेवी मंदिरात नवरात्रोत्सवाची जय्यत तयारी सुरू झालेली आहे. रविवारी १५ ऑक्टोंबरपासून मंदिराजवळ नवरात्रोत्सव विविध धार्मिक कार्यक्रम होतील. दररोज देवी जवळ अभिषेक केला जातो.
रोज पहाटे व सायंकाळी महाआरती केली जाते. पंचमी, सप्तमी, अष्टमी,व नवमीला भाविक चक्र पूजा व आरत्या लावण्यास विशेष प्राधान्य देतात पहाटेच्या काकडा आरतीचे चैतन्य नवरात्रोउत्सवात पहाटे साडेपाच पासून भाविकांची पावले मंदिराकडे वळतात . म्हसदी येथे नवरात्रोत्सवाची विशेष धूम असते संपूर्ण नऊ दिवस कार्यक्रमाचे रेलचेल आणि भाविकांचा मेळा असतो यामुळे वातावरण प्रसन्न होऊन जाते. नवरात्रोउत्सवामध्ये विविध देखावे, आकर्षक मंडप, रोषणाई करण्यात आली. परिसरात भव्य नव्याने मंदिराची उभारणी करण्यात आले आहे. यंदा दर्शन, नवसपूर्तीसाठी भाविकांची मोठी गर्दी राहील असा अंदाज आहे.
- Allu Arjun Arrested : अल्लू अर्जुनला थिएटरमध्ये झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणी अटक..!
- Dhule News : दाऊळ गावात दोंडाईचा कृषी महाविद्यालयातील कृषीकन्या दाखल…!
- Maharashtra Election 2024 Date : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांचे बिगुल अखेर वाजलं, ‘या’ तारखेला होणार मतदान…!
- LIVE TV
- Nandurbar News : ज.ग नटावदकर कनिष्ठ महाविद्यालयात अक्षय ऊर्जा दिन संपन्न…!
भाविकांना विविध सोयीसुविधा मंदिराजवळ नवसपुर्तीसाठी जागा,व इतर शुद्ध, थंड, मुबलक पाणी पिण्याचे पाणी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी धनदाईदेवी तरुण ऐक्य मंडळाने तयारी केली आहे. येथील धनदाई माता ही अनेक कुलांची कुलस्वामिनी असून, नवरात्रीच्या दरम्यान येथे गुजरात, मध्य प्रदेश, संपूर्ण खान्देशातील अनेक ठिकाणावरून लांब लांब वरून भाविक दाखल होत असतात. यावेळी व चक्र पूजा करून मनोकामना देखील पूर्ण करून मंदिरात अखंड ज्योत प्रज्वलित करून. रोज सकाळी आरती नवनवीन कपडे परिधान करून पूजा पाठ सुरू असल्यास सांगण्यात आले.भाविकांमध्ये उत्साह जवळपास ७७ पेक्षा अधिक कुळाचे भाविक देवीला कुलदैवत मानतात.
देवी नवसाला पावते अशी भाविकांची श्रद्धा आहे. डोंगराच्या कुशीत धनदाईदेवीचे पुरातन मंदिर आहे. स्वयंभू मूर्ती असून ऑक्टोंबर महिन्यात नवरात्रोत्सवासह चैत्र अष्टमीच्या यात्रोत्सवात हजारो भाविक हजेरी लावतात. भाविकांना चक्रपूजा व नवसपूर्तीसाठी ऐक्य मंडळातर्फे जागा उपलब्ध करून दिली जाते. गावापासून दीड किलोमीटर अंतरावर देवीचे सुरेख मंदिर आहे.भाविकांनी देवीचे दर्शन नवसपूर्तीसाठी सहभागी व्हावे, असे आवाहन तरुण ऐक्य मंडळाचे अध्यक्ष सुभाष गजमल देवरे, कोशाध्यक्ष उत्तमराव देवरे, उपाध्यक्ष के. एन. सचिव महेंद्र देवरे व संचालक यशवंतराव देवरे, गंगाराम देवरे, रघुनाथ देवरे, हिम्मतराव देवरे, सुधाकर देवरे, निरंजन देवरे, सुनील देवरे, राकेश देवरे, सुरेश जैन, विनयकुमार देवरे, अनिल देवरे, नरेंद्र देवरे, अमित चव्हाण, मंडळांने केले आहे.
धनदाईदेवीच्या दर्शनासाठी दरवर्षी गर्दी वाढतीच असल्याचे नवरात्रोत्सवात भाविकांनी दर्शन घेत नवसपुर्तीसाठी येणाऱ्या सर्व भाविकांच्या सोयीसाठी सज्ज असल्याची माहिती मंडळाने दिली .व मंदिर प्रशासनास सहकार्य करावे,
सुभाष गजमल देवरे अध्यक्ष धनदाई देवी तरुण ऐक्य मंडळ म्हसदी
✍🏻 MD TV न्यूज धुळे तालुका प्रतिनिधी दिलीप साळुंखे
- Allu Arjun Arrested : अल्लू अर्जुनला थिएटरमध्ये झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणी अटक..!
- Dhule News : दाऊळ गावात दोंडाईचा कृषी महाविद्यालयातील कृषीकन्या दाखल…!
- Maharashtra Election 2024 Date : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांचे बिगुल अखेर वाजलं, ‘या’ तारखेला होणार मतदान…!
- LIVE TV
- Nandurbar News : ज.ग नटावदकर कनिष्ठ महाविद्यालयात अक्षय ऊर्जा दिन संपन्न…!