धुळे : (Dhule News ) उत्तर महाराष्ट्रात सर्वी कडे विधानसभेचे वारे सुरू झालेले आहेत त्यात महत्त्वाचा विषय म्हणजे उत्तर महाराष्ट्र अर्थात खानदेश हा चर्चेचा विषय यावेळी ठरणार आहे आजपर्यंत खानदेशात मुख्य मंत्री पद मिळाले नाही तसेच खानदेशातून आजपर्यंत अनेक कॅबिनेट मंत्री पदे मिळाले परंतु आतुरता आहे खानदेशाला मुख्यमंत्री पदाची..
राज्यात भाजपा, राष्ट्रवादी अजित पवार, शिवसेना शिंदे गट मिळून युती झालेली आहे तरी युतीत प्रत्येक पक्षाला जास्तीत जास्त जागा लढवण्यासाठी नेते प्रयत्नशील आहेत यात राष्ट्रवादी अजित पवार गटाने उत्तर महाराष्ट्रात विधानसभेसाठी सहा जागा लढवण्याची संदर्भात मागणी केलेली आहे उत्तर महाराष्ट्रातील एकूण मतदारसंघांपैकी धुळे जिल्ह्यातील २, नंदुरबार २ व जळगाव २ या जिल्ह्यांमध्ये आपल्या जागा फिक्स करण्याच्या तयारीत आहेत त्यात धुळे शहरासाठी एक जागा अजित पवार गटाला सुटणार, साक्री विधानसभा ही एकनाथ शिंदे गटाला, शिरपूर व धुळे ग्रामीण भाजपाला, तर शिंदखेडा मतदार संघ हा गेली 20 वर्षापासून भाजपाला उमेदवारी देऊ केली असल्याने आता अजित पवार गटाला सुटण्याची दाट शक्यता वरिष्ठ कार्यालयातून वर्तवली जात आहे एकीकडे भाजपामधील विद्यमान आमदार जयकुमार रावल यांचे निकट वर्तीय मानले जाणारे कामराज निकम यांनी भाजपाला मोठा धक्का दिला असून त्यांनी घेतलेला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा कार्यकर्ते मेळावाचे प्रतिसाद वरिष्ठांपर्यंत पोहोचले आहेत व आमदार रावलांविषयी मतदार संघातील मतदारांच्या नाराजगीच्या प्रतिक्रिया भाजपा पक्षश्रेष्ठींपर्यंत पोहोचलेले आहेत शिंदखेडा मतदारसंघातील रावलांना यावेळेस वाढता विरोध बघता युतीमध्ये अजित पवार गटामध्ये जागा सुटण्याची दाट शक्यता व तसेच चर्चा वरिष्ठ लेवलला सुरू झालेली आहे.
‘एम.डी टीव्ही’ चं Facebook Group जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
यासाठी शिंदखेडा मतदारसंघांमध्ये अजित पवार गटातून सक्रिय नेते म्हणून ज्ञानेश्वर भामरे व राष्ट्रवादी युवक चे जिल्हा उपाध्यक्ष दीपक गिरासे हे दोन लोक आमदारकीचे इच्छुक दावेदार ठरत आहे त्यात दीपक गिरासे एक युवक म्हणून त्यांनी शेतकऱ्यांविषयी अनेक आंदोलने व पाठपुरावे केली आहेत तसेच गेली तीस वर्षांमध्ये राजपूत समाजात शरद पवार व अजित पवार राष्ट्रवादीकडून संधी मिळाली नाही यामुळे युतीतील उमेदवारीचे संकेत दीपक गिरासे यांच्याकडे राहतील तरुण राजपूत समाजातील व्यक्ती म्हणून आमदार रावलांना प्रथमता त्यांनी टक्कर देत जिल्हा परिषद पंचायत समितीच्या माध्यमातून चांगली मते घेत हे तालुक्यात सिद्ध केले आहे की त्यांच्यात राजकीय अभ्यास आहे.
तसेच दुसरे प्रतिस्पर्धी ज्ञानेश्वर भामरे यांनी देखील अजित पवार गटात आपले कार्य चालू ठेवले आहे परंतु शेतकरी वर्गामध्ये त्यांच्यावर नाराजगीची सुर दिसून येत आहे व सामाजिक दृष्ट्या राजकारण बघितले तर शाहू पाटील समाजातून अनेक उमेदवार उत्सुकतेच आहेत याचा विरोध फटका भामरे यांना बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे अशी माहिती मुंबई येथील मुख्य सूत्रांकडून आली आहे.
तालुक्यात अनेक मातंबर नेत्यांनी विधानसभेमध्ये आपले भविष्य आज म्हणून बघितले परंतु प्रत्येकाचा पराजय पन्नास हजार मतांच्या जवळपास झाला आहे म्हणून आता मतदार संघातील जनतेला एक नवीन तरुण उमेदवाराची उत्सुकता चर्चेतून दिसून येत आहे जयकुमार रावलांचे तिकीट कापले गेले तर राष्ट्रवादी अजितदादा गटात मोठी संधी कार्यकर्त्यांसाठी येणार यात शंका नाही.
‘एम.डी टीव्ही’ चं Facebook Group जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
✍🏻 MD TV न्यूज धुळे तालुका प्रतिनिधी दिलीप साळुंखे