Dhule News : शिंदखेड़ा जि. प. पोटनिवडणूक 18 पैकी 13 ची माघार Shindkheda ZP Potnivdnuk

0
171
Shindkheda ZP Potnivdnuk

Dhule News – ( शिंदखेडा प्रतिनिधी यादवराव सावंत )    तालुक्यात चिमठाणे गटातील जि.प.सदस्य विरेंद्रसिंग गिरासे अपात्र ठरल्याने तर मेथी गटाचे ज्ञानेश्वर भामरे यांनी राजीनामा दिल्यानंतर सदरील दोन्ही जागेवर पोटनिवडणूक प्रकिया राबविण्यात येत आहे.

त्यासाठी चिमठाणे गटासाठी एकुण दहा इच्छुक उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. आज माघारी अंती बोरसे भरत विनायक  , गिरासे सिंधुबाई विरेंद्रसिंग,  गिरासे योगेंद्रसिंग जयसिंग, पाटील नरेंद्र विनायक, वाघ नानाभाऊ भिवसन, गिरासे जितेंद्र धनसिंग, गिरासे महेंद्र पारसिंग यांनी माघार घेतल्यावर महाविकास आघाडी चे शिवसेना ( उबाठा ) चे उमेदवार डॉ. गिरासे भरतसिंग पारसिंग चिन्ह मशाल तर भाजपा चे गिरासे महेंद्र सुरजसिंग चिन्ह कमळ  यांच्यात सरळ लढत होणार आहे.

मेथी गटासाठी खैरनार राजेंद्र आत्माराम , पाटील अर्चना प्रभाकर, पाटील रविंद्र अशोक ,देवरे ज्ञानेश्वर उत्तम ,विजय अशोक पाटील , पाटील बापू काळु यांनी माघार घेतल्यावर अपक्ष दिपक रजेसिंग गिरासे ( नारळ ) पाटील प्रभाकर रघुनाथ ( भाजपा चिन्ह कमळ ) तर महाविकास आघाडीचे काँग्रेस चे पाटील निंबा भुता ( हात ) यांच्यात तिरंगी लढत होणार आहे. हयावेळी निवडणूक प्रकिया साठी निवडणूक निर्णय अधिकारी संदिप पाटील, सहाय्यक तहसिलदार ज्ञानेश्वर सपकाळे , नायब तहसिलदार एस.बी.राणे यांनी चिन्ह वाटपाचे  काम पाहिले. 17 डिसेंबर रोजी मतदान तर 18 डिसेंबर ला मतमोजणी होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here