Dhule News Today – साक्री तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातील चिंचपाडा या छोट्याशा आदिवासी पाड्यातील छोटू झिपरू पवार यांची कन्या चैताली छोटू पवार हिला दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघ, नाशिकचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. महेंद्र देशपांडे यांच्यातर्फे पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
‘एम.डी टीव्ही’ चं Facebook Group जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
तसेच चैताली छोटू पवार हिने शालेय उपक्रमासह आदिवासी समाजातील विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून आदिवासी समाजामध्ये व्याख्यानाद्वारे प्रबोधन करून समाजकार्य केले.
- Maharashtra Expressway – ‘समृद्धी’नंतर महाराष्ट्राला मिळणार ‘पुणे-बंगळूर’ ग्रीन फील्ड…!
- Shreyas Iyer ची प्रकृती चिंताजनक सिडनीतील रुग्णालयात ICU मध्ये उपचार सुरू..!
- देशाचे ५३ वे सरन्यायाधीश कोण ? CJI Gavai यांनी सुचवले मोठे नाव..
- बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी Maharashtra Schools चा मोठा निर्णय! एक्झाम फॉर्म भरण्यासाठी आता ‘या’ तारखेपर्यंत मुदतवाढ
- सरकारी कार्यालयात ID Card नसेल, तर Government Employee च्या पगार कापणार? मोठा निर्णय

यामुळे नॅशनल एक्सलन्स ऍवॉर्ड-2024 ने सापुतारा येथील हॉटेल असोसिएशनचे अध्यक्ष उपेंद्रभाई पटेल, अरविंद सोनवणे, डॉ. आशाताई पाटील, अमोल शिंदे, डॉ. लालबहादूर राणा, मयूर रत्नपारखी, पूजा जैन, प्रमोद कुलकर्णी, प्रदीप हरसोरा यांच्या उपस्थितीत चैतालीला गौरविण्यात आले. चैताली पवारला पुरस्कार मिळाल्याबद्दल पंचायत समिती सदस्य संगीता गावित, गणेश गावित, तानाजी बहिरम, प्रेमचंद सोनवणे, मन्साराम भोये, पुष्पा चौधरी, अजय राऊत, संदीप भोये यांनी चैतालीचे कौतुक केले.
✍🏻 कर्तव्यदक्ष पोलीस धुळे तालुका प्रतिनिधी दिलीप साळुंखे…

