Dhule News Today : नेर येथील महादेव वस्तीतील जि.प शाळेस विविध वस्तू भेट..!

0
240
Dhule-News-Today-Gift-of-various-items-to-District-School-in-Mahadev-Vasti-Ner

धुळे ( Dhule News Today ) तालुक्यातील नेर येथील जि प शाळा महादेव वस्तीतील शाळेस विविध वस्तू भेट देण्यात आले आहे.तसेच

नेर केंद्रांतर्गत नव्याने सुरू झालेल्या महादेव वस्ती शाळेस स्थानिक तसेच भौतिक परिस्थिती लक्षात घेता विद्यार्थी हित लक्षात घेता विद्यार्थी उपयोगी वस्तू भेट म्हणून दिल्या.

नेर गटाचे सन्माननीय जिल्हा परिषद सदस्य श्री आनंदभाऊ पाटील यांनी विद्यार्थ्यांना ऊन वारा पाऊस यांपासून संरक्षण व्हावे म्हणून ताडपत्री (२०००/- रू.) भेट दिली ज्यामुळे विद्यार्थ्यांना हक्काचे छत मिळाले.

Dhule News Today Gift of various items to District School in Mahadev Vasti Ner

‘एम.डी टीव्ही’ चं Facebook  Group जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

‘एम.डी टीव्ही’ चं Telegram  Group जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

शाळेस भेट देण्यासाठी आलेले अधिकारी केंद्रप्रमुख श्री प्रेमानंद उपाचार्य यांनी सर्व विद्यार्थ्यांना पिण्यास शुद्ध पाणी मिळावे यासाठी दररोज मिनरल जारची (ॲडव्हांस २०००/- रू.) व्यवस्था शाळा सुरू असे पर्यंत करून दिली.

तसेच शाळेतील नव्याने रुजू झालेले शिक्षक श्री जगदिश बोरसे यांनी सहा खुर्ची ( ४२००/- रू.) शाळेस भेट दिली.तसेच नव्याने रुजू झालेल्या विषय शिक्षिका श्रीमती सपना पवार यांनी सर्व विद्यार्थ्यांना खाली बसण्यासाठी  २५ आसन पट्ट्या (२८००/- रू.)  भेट म्हणून दिल्या.

शाळेवर प्रेम करणाऱ्या सर्व मान्यवरांचे पदोन्नती मुख्याध्यापक श्री विनोद कुवर, अध्यक्ष तथा उपसरपंच नेर श्री जीवनभाऊ मोरे, श्री दयाराम दादा चव्हाण, श्री विजय जगदाळे तसेच पालकांनी मनस्वी आभार व्यक्त केले.

पालकांना प्रेरित करण्यासाठी शाळेच्या वतीने श्री रामभाऊ पाटील यांनी तसेच श्री योगेश कोळी यांनी आवाहन केले.तसेच

कार्यक्रमाचे सूत्रसंचलन श्री न्हानू माळी यांनी केले. तर आभार श्री अनिल साळुंके यांनी व्यक्त केले. या भेट रुपी वस्तूंनी शाळेत तसेच गावात एक नवचैतन्य पहावयास मिळाले.

✍🏻 MD TV न्यूज धुळे तालुका प्रतिनिधी दिलीप साळुंखे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here