Dhule News Today : नेर गावात रुग्णवाहीकेचे लोकार्पण सोहळा…!

0
217

Dhule News Today –  धुळे तालुक्यातील नेर येथील गावात रुग्णवाहीकेचे लोकार्पण करण्यात आले.तसेच धुळे-सुरत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वर होणाऱ्या अपघातग्रस्त रुग्णांना तत्काळ उपचार मिळावा तसेच वेळ न गमावता रुग्णालयात दाखल करण्यासाठी श्री.जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थान नाणीजधाम ता.जि. रत्नागिरी यांच्यामार्फत २२ लक्ष किमतीची रुग्णवाहीका नेर गावात मिळाली आहे.

Dhule News Today Ner Ambulance 3

यात महामार्गावर होणाऱ्या अपघातग्रस्तांसाठी ही रुग्णवाहीका मोफत धावणार आहे.यामध्ये रुग्णनातेवाईकांना कोणत्याही प्रकारे इंधन खर्च,चालक भत्ता,बक्षीस देण्याची गरज भासणार नाही.रुग्णवाहिकेवर मदत क्रमांक ८८८८२६३०३० उपलब्ध आहे.आपण हा क्रमांक जपून ठेवावा.

Dhule News Today Ner Ambulance 2

‘एम.डी टीव्ही’ चं Facebook  Group जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

यावर संपर्क करून अपघातग्रस्त रुग्णाला तत्काळ मदत मिळू शकते.रुग्णवाहिकेचा संपूर्ण खर्च हा संस्थानामार्फत करण्यात येणार असल्याचे संस्थानाचे उपपीठ उत्तर महाराष्ट्र व्यवस्थापक नाशिक,प्रवीण ठाकूर यांनी प्रतिपादन केले आहे.लोकार्पण सोहळा नेर ग्रामपंचायत सरपंच,सदस्य यांच्या सहकार्याने येथिल महात्मा गांधी चौक याठिकाणी घेण्यात आला. यावेळी सरपंच गायत्री जयस्वाल,संस्थानाचे उपपीठ उत्तर महाराष्ट्र व्यवस्थापक नाशिक,प्रवीण ठाकूर, उत्तर महा.

Dhule News Today Ner Ambulance 1

पीठ कृषी समिती अध्यक्ष शेडगे साहेब,माजी.नायब तहसीलदार गजमल गांगुर्डे, धुळे जिल्हा सेवा समिती अध्यक्ष रतिलाल सोनवणे,जिल्हा सचिव अशोक वाणी,तालुकाध्यक्ष विनायक सरोदे,महिला अध्यक्षा धुळे जिल्हा हेमलता वाणी नेर गावातील जेष्ठ नागरिक ह.भ.प. तुकाराम माळी,गुलाब बोरसे,माजी सरपंच दिलीप सोनवणे,माजी उपसरपंच पंढरीनाथ शंखपाळ,निंबा माळी,संतोष ईशी,जगन्नाथ सोनवणे,डॉ.सुनिल सोनवणे,बाळू आण्णा सोनवणे,संजय सैंदाणे,विश्वास याळीस, राजधर अमृतसागर,सुनिल चौधरी,विजय जगदाळे,पंकज वाघ,सतीश बोडरे,निर्मला आखाडे आदी ग्रामस्थ,महिला उपस्थित होते.संस्थानामार्फत रुग्णवाहीका मिळाली असे भरीव योगदान आम्हाला लाभले यासाठी नेर गावाच्या सरपंच गायत्री जयस्वाल यांनी जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थान यांचे शब्दसूमणांनी विशेष आभार मानले.यावेळी गावातील सामाजिक कार्यकर्ते संजय सैंदाणे,पंकज वाघ यांनी नागरिकांना उपकृत केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नेर येथिल सुरज खलाणे यांनी केले.

Dhule News Today Ner Ambulance 3

✍🏻 MD TV न्यूज धुळे तालुका प्रतिनिधी दिलीप साळुंखे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here