Dhule News Today : दोंडाईचा पोलिसांकडून नायलॉन मांजा विक्रीविरुद्ध आवाहन..!

0
123
dhule-news-today-dondaicha-police-against-sale-of-nylon-manja

दोंडाईचा पोलिसांनी मकरसंक्राती ( Makar Sankranti 2024 ) निमित्त नायलॉन मांजा विक्रीविरुद्ध आवाहन केले आहे. नायलॉन मांजा वापरामुळे होणाऱ्या दुर्घटनांना प्रतिबंध करण्यासाठी हे आवाहन करण्यात आले आहे.

Dhule News Today : मकर संक्रांती 2024 15 जानेवारी 2024 रोजी साजरी केली जाणार आहे त्यातच दोंडाईंचा ( Dondaicha ) येथे मकरसक्रांती सणाचे दिवशी मोठया प्रमाणावर पतंगबाजी करुन लोक सदरचा सण मोठ्या उत्साहाने साजरा करतात, परंतु सक्रांती सणामध्ये पतंगबाजी करतांना वापरण्यात येणाऱ्या नॉयलॉन मांज्याचा ( nylon manja ) वापर खूप मोठ्या प्रमाणावर वाढत असल्यामुळे मनुष्य, पक्षी व प्राण्यांची जीवीत हानी झाल्याच्या व जखमी झाल्याच्या घटना घडलेल्या आहेत. तसेच मागील कालावधीत मुंबई येथील पोलीस अंमलदार यांचा नॉयलॉन मांज्यामुळे अपघाती मृत्यू होऊन दुदैवी घटना घडलेली आहे.

‘एम.डी टीव्ही’ चं Facebook  Group जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

‘एम.डी टीव्ही’ चं Telegram  Group जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

पतंगबाजीमध्ये मोठ्या प्रमाणावर होत असलेल्या नॉयलॉन मांज्याचे वापरामुळे होणा-या दुर्घटनांना प्रतिबंध होण्यासाठी मा.उच्च न्यायालय मुंबई, खंडपीठ औरंगाबाद यांनी Suo Moto PIL क्र. ०८/२०२० नुसार दखल करुन त्यात दि.२०/१२/२०२२ रोजीच्या सुनावणी आदेशात नॉयलॉन मांजाचे ( nylon manja ) वापरा संदर्भात प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याबाबत निर्देश देखील दिलेले आहेत.

घातक असलेला नॉयलॉन मांज्याचा ( nylon manja ) वापर हा पतंगबाजीकरीता होऊ नये यासाठी पोलीस अधीक्षक धुळे यांनी तात्काळ उपाययोजना करूण कार्यवाही करावी.

पतंगबाजी करीता वापरण्यात येणाऱ्या मांज्याची वाहतुक, साठवणुक, विक्री व वापराबाबत दोंडाईंचा शहरात व परिसरात ज्यांच्याकडे मांजा विक्री होत असेल त्यांनी तात्काळ पोलीस स्टेशन शी संपर्क साधावा  जनतेकडून प्राप्त होणाऱ्या तक्रारींची तात्काळ दखल घेऊन त्यावर ॲक्ट, १९८६ अंतर्गत तात्काळ कायदेशीर कारवाई करावी. याकरीता जिल्हास्तरावर एक स्वतंत्र कक्ष  सदर कक्षामध्ये ठराविक पोलीस अधिकारी यांची नेमणुक करुन त्यांचे मोबाईल फोन नंबरची जनतेत प्रसिध्दी द्यावी. जेणेकरुन जनतेला सदर मोबाईल क्रमांकावर नायलॉन मांजासंबंधीची माहिती देणे शक्य होईल.

दोंडाईंचा ( Dondaicha ) पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक श्रीराम पवार साहेब  यांच्यांशी  संर्पक साधावा   9881745101 / 02566244023 दोंडाईंचा शहर व परिसरात कुठे हि मांजा विक्री करतांना दिसल्यास हा नंबर वर संपर्क साधावा नॉयलॉन मांजा वापराचे गैरप्रकार आढळल्यास तात्काळ दोंडाईंचा पोलीसांकडे तक्रारी नोंदविण्या बाबत आवाहन करावे असे सांगण्यात आले आहे. 

✍🏻 MD TV न्यूज धुळे तालुका प्रतिनिधी दिलीप साळुंखे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here