Dhule News… उभंड जिल्हा परिषद शाळेची इमारत बनली मृत्यूचा सापळा… चिमुकल्यांच्या जीवाशी चालवलाय खेळ..!

0
319

गळकी व पडक्या शाळेने विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात ; शिक्षण विभाग झोपेत

धुळे:- साक्री तालुक्यातील उभंड येथील जिल्हा परिषद शाळेच्या खोल्या पहिल्याच पावसात गळू लागल्या आहेत. तर स्लॅपचे प्लास्टरही धोकेदायक स्थितीत असून शाळेच्या भिंतींना मोठमोठे तडे गेले आहेत. शाळेच्या वर्ग खोल्यांची दुरावस्था असल्याने अनेक वर्गांचे विद्यार्थी एकाच वर्गात बसवले जात आहेत. मात्र यामुळे विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. शाळेची एव्हडी वाईट अवस्था असताना येथे वर्ग भरवून चिमुकल्यांच्या जीवाशी प्रशासन खेळ खेळीत आहे. या ठिकाणी मोठा अनर्थ घडू शकतो हे दिसत असताना प्रशासनाने का दुर्लक्ष केले आहे? मोठा अपघात होण्याची वाट पाहत आहात का ? असा प्रश उपस्थित होत आहे.

e58d1702 fc30 4a75 81ab 610766b1c1b3 1

हे सुध्दा वाचा

Nandurbar News.. धूम स्टाईलने सोन्याची चैन पळणाऱ्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेने ठोकल्या बेड्या… १३ गुन्हे उघड | MDTV NEWS

धमनार परिसरात बिबट्याची दहशत.. गोऱ्हावर हल्ला करत केले ठार | MDTV NEWS

कजगाव बंद… सरपंचच उतरले रस्त्यावर; गावकऱ्यांचा रास्तारोको ! | MDTV NEWS

तळोदा, अक्कलकुव्यात मुसळधार .. शेतीसह अनेक घरांमध्ये शिरले पाणी | MDTV NEWS

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

साक्री तालुक्यात काही दिवसांपासून मुसळधारसह पावसाची संततधार सुरु आहे. उभंड परिसरात देखील मुसळधार पाऊस होत आहे. गावात अनेक ठिकाणी पाणी साचले असून जिल्हा परिषद शाळेच्या आवाराला तलावाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. शाळेच्या वर्ग खोल्यांची प्रचंड दुरावस्था झाली असून यातील बहुतांश शाळा गाळताहेत. जिल्हा परिषद शाळेच्या वर्ग खोल्याचे प्लास्टर मटेरियल पडल्याने अनेक ठिकाणी मोठे खड्डे तर काही ठिकाणी भिंतींना तडे गेले आहेत. पहिल्याच पावसात शाळेचे छत गाळू लागले आहे. शाळेतील विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. या शाळेत पहिली ते चौथी पर्यंतचे वर्ग आहेत. मात्र या ठिकाणी चार पैकी तीन वर्ग खोल्या पडक्या अवस्थेत आहेत. यामुळे शिक्षण व विद्यार्थ्यांना अभ्यास समजणे अवजड झाले आहेत. याकडे शिक्षण विभागाने लक्ष देण्याची देण्याची मागणी पालक वर्ग करीत आहे.

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

गावात सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले असून शाळा-शाळांमध्येही आता पाणी शिरू लागलं आहे. घाण पाण्यातून रस्ता काढीत शाळेत जात असल्याचे जावे लागत आहे. गावकरी चांगलेच वैतागले आहेत. जागोजागी खड्डे, खड्डयात पाणी अन् चिखलमय रस्ता झाल्याने नागरिकांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

हे सुध्दा वाचा

Nandurbar News.. धूम स्टाईलने सोन्याची चैन पळणाऱ्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेने ठोकल्या बेड्या… १३ गुन्हे उघड | MDTV NEWS

धमनार परिसरात बिबट्याची दहशत.. गोऱ्हावर हल्ला करत केले ठार | MDTV NEWS

कजगाव बंद… सरपंचच उतरले रस्त्यावर; गावकऱ्यांचा रास्तारोको ! | MDTV NEWS

तळोदा, अक्कलकुव्यात मुसळधार .. शेतीसह अनेक घरांमध्ये शिरले पाणी | MDTV NEWS

काय म्हणतात पालक…

माझ्या मुलीला दररोज शाळेत सोडण्यासाठी येतो. मात्र पटांगणातच पाणी व घाण पाण्यातून मार्ग काढीत मुलांना शाळेत सोडावे लागते. मुलांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. वेळेत दुरुस्ती न झाल्यास मुलांचे आरोग्य आणखीन धोक्यात येईल, अशी प्रतिक्रिया हेमंत पाटील यांनी दिली आहे.
जिल्हा परिषद मराठी शाळा गेल्या अनेक दिवसापासून या शाळेचे दुरावस्था झालेली आहे. येथे चार खोल्या असून तीन खोल्यांची छत गळून शाळेच्या भिंतींना तडे गेले आहेत. यामुळे विद्यार्थ्यां जीवाला धोका निर्माण झाला आहे. अनेक वेळेस शिक्षण विभागाला निवेदन देऊनही दुर्लक्ष करीत आहे. जीवित हानी व वित्तहानी झाल्यास शिक्षण विभाग जबाबदार राहील, असा इशारा उभंडचे सरपंच योगेश नेरकर यांनी दिला आहे.

✍🏻 दिलीप साळुंखे. एमडीटीव्ही न्युज धुळे ग्रामीण.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here