Dhule News : आठ महिन्यांच्या बालिकेचा वन्य प्राण्याच्या हल्ल्यात मृत्यू

0
616

Dhule News – जिल्ह्यातील नंदाळे बुद्रुक येथे रविवारी दुपारी वन्य प्राण्याने आठ महिन्यांच्या बालिकेवर हल्ला केल्याने तिचा मृत्यू झाला. दीदी शिवराम पावरा असे या बालिकेचे नाव आहे.

download

नंदाळे शेत शिवारात आईवडील कपाशी वेचण्याचे काम करत असताना दीदी लिंबाच्या झाडाखाली खेळत होती. अचानक आलेल्या वन्य प्राण्याने तिच्यावर हल्ला चढवला आणि तिला फरफटत नेले. बालिकेच्या आईने आरडाओरड केल्यावर प्राण्याने तिला सोडून पळून गेला.

गंभीर जखमी बालिकेला तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला.

या घटनेची नोंद धुळे तालुका पोलीस ठाण्यात झाली आहे. पोलीस उपनिरीक्षक राजश्री पाटील यांनी सांगितले की, बालिकेच्या आईला प्राणी कोणता होता हे सांगता आले नाही. तो मोठ्या मांजरीसारखा होता, असे त्याने सांगितले.

या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here