धुळे कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुक : कोण बाजी मारणार, आघाडी की भाजप?

0
144

धुळे -२६/४/२३

Dhule Apmc Election : धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीतील निवडणूक ही भाजपा विरुद्ध महाविकास आघाडी अशी होत आहे.
मात्र, असे असले तरी यात खासदार डॉ. सुभाष भामरे विरुद्ध आमदार कुणाल पाटील अशीच प्रमुख लढत होताना दिसत आहे.

धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीची चुरस आता अधिक वाढली आहे. आज माघारीच्या शेवटच्या दिवशी महाविकास आघाडी पुरस्कृत शेतकरी विकास पॅनलच्या व्यापारी मतदारसंघातील १ जागा आणि भाजपा पुरस्कृत पॅनल ची १ जागा अशा दोन्ही जागा बिनविरोध झाल्या असून विजयी झालेल्या दोन्ही उमेदवारांचा आमदार कुणाल पाटील यांनी सत्कार करून त्यांना शुभेच्छा दिल्या आहे.
धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत यंदा प्रथमच भाजप पुरस्कृत पॅनलने उडी घेतली असून काँग्रेस पुरस्कृत शेतकरी विकास पॅनलची गेल्या २५ वर्षांपासूनची असलेली सत्ता उलथून टाकण्याचा निश्चय भाजपने केला आहे.
तर एकीकडे धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीतील निवडणूक ही भाजपा विरुद्ध महाविकास आघाडी होत असली तरी यात प्रामुख्याने लढत खासदार डॉ. सुभाष भामरे विरुद्ध आमदार कुणाल पाटील यांच्यात होणार आहे हे आता स्पष्ट झाले आहे. यामुळे यंदा या निवडणुकीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून आहे.
धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी भाजपने मोठ्या प्रमाणावर प्रचाराला सुरुवात केली आहे.
आज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी माघारीचा शेवटचा दिवस होता.

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
या शेवटच्या दिवशी महाविकास आघाडी पुरस्कृत शेतकरी विकास पॅनलच्या व्यापारी मतदारसंघातील १ जागा ही बिनविरोध झाली असून आणखी एक जागा विजयाच्या उंबरठ्यावर असल्याची प्रतिक्रिया धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील यांनी व्यक्त केली आहे.
या विजयी झालेल्या दोन उमेदवारांचा आमदार कुणाल पाटील यांनी त्यांच्या निवासस्थानी सत्कार केला.
उर्वरित सोळा जागांवर काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या शेतकरी विकास पॅनल चा विजय होईल असा विश्वास व्यक्त करत, या निवडणुकीतील ९०% मतदार हे काँग्रेसच्याच विचारांचे असल्याने आमचा विजय निश्चित असल्याची प्रतिक्रिया आमदार कुणाल पाटील यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली.
दिलीप साळुंखे,प्रतिनिधी ,धुळे ,एम डी टी व्ही न्यूज ..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here