धुळे :- धुळे वन विभागाच्या ‘वन भवन’ या प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य, मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते शुक्रवार २६ मे रोजी दुपारी १२.३० वाजता होणार आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे ग्रामविकास व पंचायती राज, वैद्यकीय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीष महाजन हे राहणार आहेत.
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून धुळे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अश्विनी पवार, महापौर प्रतिभा चौधरी, खा.डॉ. सुभाष भामरे, खा.डॉ.हिना गावीत, आ.अमरिशभाई पटेल, आ.किशोर दराडे, आ.सत्यजीत तांबे, आ.जयकुमार रावल, आ.काशिराम पावरा, आ.कुणाल पाटील, आ.मंजुळाताई गावीत, आ.फारुक शाह हे उपस्थित राहणार असून महसूल व वन विभागाचे प्रधान सचिव बी. वेणूगोपाल रेड्डी, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन बल प्रमुख) डॉ.वाय.एल.पी.राव, धुळे वनवृत्तचे वनसंरक्षक (प्रादेशिक) दिगंबर पगार, जिल्हाधिकारी जलज शर्मा, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता इंजि. विवेक नवले यांची विशेष उपस्थिती राहणार आहे.
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन धुळे चे उप वनसंरक्षक नितीनकुमार सिंग, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता इंजि. रविंद्र पाटील, विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता इंजि. सचिन पाटील यांनी केले आहे.
एम.डी.टी.व्ही. न्युज ब्युरो नंदुरबार.