अपंग समावेशित शिक्षक : अन्याय खपवून घेतला जाणार नाही-शुभांगी पाटील

0
244

धुळे -४/५/२३

धुळ्यात एक मे महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे औचित्य साधून राज्यातील अपंग शाळांवरील अपंग समावेशित शिक्षकांचा मेळावा हिंदी राष्ट्रभाषा भवन धुळे येथे आयोजित करण्यात आला होता.
या मेळाव्याला राज्यभरातून अपंग समावेशित शाळांवरील सुमारे 300 ते 400 शिक्षक उपस्थित होते.

DP4


या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी शिवसेना उत्तर महाराष्ट्र महिला आघाडीच्या संपर्कप्रमुख तथा महाराष्ट्र टीचर्स असोसिएशनच्या राज्याध्यक्ष शुभांगी पाटील या उपस्थित होत्या.
प्रास्ताविकात व आपल्या मनोगतात या शिक्षकांवर सुरुवातीपासूनच कशाप्रकारे अन्याय झालेला आहे याबाबत अनेक शिक्षकांनी आपले मत मांडले.
ज्यामध्ये सुरवाती पासून म्हणजे सुरुवातीलाच नोकरीला लागते वेळी आम्हाला अनेक शिक्षकांना अनेक गोष्टी अंधारात ठेवून नोकरी दिली गेली. त्यात शैक्षणिक आहार्यता बाबत माहिती झाली. नोकरीला लागल्यानंतर तीन वर्षाच्या आत विशेष शिक्षक अहर्ता घेण्याची अट कळाली व त्यामुळे विशेष शिक्षक बनण्यासाठी चे शिक्षण घेतले.
यात बहुतांश सर्व लोकांनी ही अट नंतर पूर्ण केली. त्यानंतर शासनाने वेळोवेळी वेगवेगळे नियम ,अटी, परिपत्रके काढत या शिक्षकांवर वेळोवेळी अन्याय केला. नकळत नोकरीच्या आशेवर आम्ही या सर्व दृष्टचक्रात कधी अडकलो ते आम्हाला देखील कळाले नाही.
आणि आज सर्वांच्या लेखी आम्ही काहीतरी मोठा गुन्हा केला अशा भावनेने शासनापासून ते प्रशासनापर्यंत व अधिकाऱ्यांपासून ते शिपायापर्यंत समाजातील सर्वच घटकांकडून आमच्याकडे दोषी म्हणून बघितले जाते. त्याचबरोबर चौकशीच्या नावावर शिक्षकांना सेवा समाप्तीच्या नोटीसा देण्यात येत असल्याची माहिती यावेळी शिक्षकां कडून राज्याध्यक्ष शुभांगी पाटील यांना देण्यात आली.
आपल्या अध्यक्षीय भाषणात राज्याध्यक्ष शुभांगी पाटील यांनी या शिक्षकांना उद्देशून सांगितले की “यापुढे अपंग समावेशित शिक्षकांवरील अन्याय खपवून घेतला जाणार नाही”
मी सुरुवातीपासूनच या शिक्षकांच्या बाजूने होते, परंतु विनाअनुदानित शिक्षकांना न्याय मिळवून देण्याच्या लढाईत तुमच्या प्रश्नांकडे थोडे दुर्लक्ष झाले!
परंतु आता असे होणार नाही कारण ,यामध्ये केवळ शिक्षकांचा दोष नाही तर ज्यांनी नियुक्त्या दिल्या, त्याचप्रमाणे ज्यांनी वैयक्तिक मान्यता दिल्या..
आधी वेतन सुरू केले व आता सेवा समाप्तीच्या नोटीस देत आहेत. त्या सर्व घटकांचा यामध्ये दोष आहे.
त्यामुळे केवळ शिक्षकांना दोषी ठरवून त्यांच्यावर केला जाणारा अन्याय यापुढे खपवून घेतला जाणार नाही! व त्यासाठी यापुढील लढा तुमच्या सर्वांच्या साथीने आपण लढणार असल्याचे यावेळी शुभांगी पाटील यांनी सांगितले.
MD TV न्यूज ,धुळे तालुका प्रतिनिधी ,दिलीप साळुंखे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here