नंदुरबार -३१/३/२३
सामाजिक न्याय विभागाच्यावतीने आजपासून महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून 1 एप्रिल,2023 ते 1 मे,2023 या कालावधीत सामाजिक पर्व अभियानातंर्गत विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती समाज कल्याणचे सहायक आयुक्त देविदास नांदगांवकर यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.
सामाजिक समतापर्व निमित्त अनुसूचित जाती व नवबौध्द मुलींची शासकीय निवासी शाळा होळ तर्फे हवेली ता.जि.नंदुरबार येथे राबविण्यात येणाऱ्या कार्यक्रमात विविध योजनांची माहिती, सर्व महाविद्यालय, आश्रमशाळा, निवासी शाळा, शासकीय वसतीगृहामध्ये भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारावर आधारीत वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, पथनाट्य स्पर्धा यांचे आयोजन करण्यात आले आहे.
त्याचबरोबर लाभार्थ्यांना जिल्हास्तरावर व तालुकास्तरावर स्वाधार योजना, शिष्यवृत्ती योजना, मिनी ट्रॅक्टर योजना, कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण योजनांची माहिती देण्यात येईल तसेच लाभार्थ्यांसाठी विविध कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
या अभियानातंर्गत समतादूतामार्फत ग्रामीण व शहरी भागात पथनाट्य व लघु नाटिकेद्वारे जनतेला सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांबाबत प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयेाजन करण्यात येणार आहे.
7 एप्रिल,2023 रोजी जागतिक आरोग्य दिनानिमित्त ज्येष्ठ नागरीक, तृतीयपंथी, ऊसतोड कामगार यांचेसाठी आरोग्य विभागामार्फत तपासणी शिबीर
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/36S6BFu
तसेच 11 एप्रिल रोजी महात्मा फुले जयंतीनिमित्त व्याख्यानपर कार्यक्रमाचे आयेाजन करण्यात येणार आहे.
14 एप्रिल रोजी सामाजिक न्याय विभागामार्फत सर्व शासकीय कार्यालय, महाविद्यालय, निवासीशाळा, आश्रमशाळा येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादनांचा कार्यक्रम, व्याख्यान, चर्चा सत्राचे आयेाजन करण्यात येणार आहे. तरी या कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन नांदगांवकर यांनी केले आहे.
प्रविण चव्हाण, एम. डी. टी.व्ही न्यूज जिल्हा प्रतिनिधी.,नंदुरबार