अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा नगरीत 12 जुलै रोजी ज्ञानेश्वरी जयंती निमित्त एक आगळावेगळा आणि भक्तीभावाने ओथंबलेला सोहळा संपन्न झाला. अवघ्या तीन मिनिटात 9033 ओव्या असलेल्या ग्रंथश्रेष्ठ ज्ञानेश्वरीचे पारायण व दीपोत्सव संपन्न झाला.
हभप रामकृष्ण महाराज कंठाळे सर यांच्या संकल्पनेतून हा सोहळा आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी दुपारी ग्रंथराज ज्ञानेश्वरी दिंडी संपन्न झाली. या प्रसंगी हजारो भाविक वारकरी सहभागी झाले होते. श्री मोहिनीराज मंदिरासमोर सर्व ग्रामस्थ, पत्रकार, मंदिराचे विश्वस्त, पुजारी यांनी दिंडीचे व दिंडीचे नेतृत्व करणाऱ्या संत मंडळींचे स्वागत केले. त्यानंतर दिंडी पुन्हा ज्ञानेश्वर मंदिरात आली आणि जागतिक विक्रम करणारा सोहळा संपन्न झाला.
एरवी ग्रंथराज ज्ञानेश्वरीचे पारायण सात दिवस चालते, परंतु कंठाळे महाराज यांच्या संकल्पनेतून हा पारायण सोहळा तीन मिनिटात पार पडला. प्रत्येकाला दहा दहा ओव्या देण्यात आल्या होत्या आणि अध्याय क्रमांकानुसार सर्वांची मंदिराच्या प्रांगणात बसण्याची व्यवस्था केली होती. त्याचप्रमाणे प्रत्येकाकडे दहा दहा दिवे देण्यात आले होते. आणि हे दिवे मंदिराच्या समोरील पायऱ्या, ध्वजस्तंभ, पिंपळाचा पार अशा विविध ठिकाणी एकाच वेळेस लावण्यात आले. हे दृश्य खरोखर दृष्ट लागण्यासारखे होते.
दीपोत्सव झाल्यानंतर सर्वांनी एकाच वेळेस आपल्याला सांगितलेल्या ओव्या वाचन करण्यास सुरुवात केली आणि हा संपूर्ण ज्ञानेश्वरी वाचनाचा सोहळा अवघ्या तीन मिनिटात संपन्न झाला. याप्रसंगी जागतिक विक्रम संघटनेचे सचिव डॉक्टर दीपक हारके यांनी कंठाळे सर आणि सर्व संत, वाचक यांचे कौतुक करून सन्मानपत्र बहाल केले.
कार्यक्रमास संत महंत देवस्थानाचे विश्वस्त आणि भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या बातमीतील महत्त्वाचे मुद्दे:
- नेवासा नगरीत ज्ञानेश्वरी जयंती निमित्त अवघ्या तीन मिनिटात ज्ञानेश्वरी पारायण झाला.
- हा जागतिक विक्रम आहे.
- या पारायणात हजारो भाविक वारकरी सहभागी झाले.
- हभप रामकृष्ण महाराज कंठाळे सर यांच्या संकल्पनेतून हा सोहळा आयोजित करण्यात आला.
या बातमीमुळे वाचकांना खालील गोष्टी समजतील:
- ज्ञानेश्वरी पारायण हे एक धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्वाचे कार्य आहे.
- नेवासा नगरी हे ज्ञानेश्वरीचे माहेरघर आहे.
- हभप रामकृष्ण महाराज कंठाळे सर हे एक विद्वान आणि समाजसेवक आहेत.
या बातमीचा परिणाम:
- हा सोहळा ज्ञानेश्वरीचे महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित करतो.
- यामुळे नेवासा नगरीचे नाव जगभरात गाजले आहे.
- हभप रामकृष्ण महाराज कंठाळे सर यांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर सन्मान मिळाला आहे.
श्रीरामपूर तालुका प्रतिनिधी श्री तात्यासाहेब शेरकर