मंदीर नको वाचनालय बांधा… बिरसा फायटर्सचा आंदोलनाचा इशारा

0
234

तळोदा :- नगरपालिका हद्दीतील आदिवासी सांस्कृतिक भवन बांधण्यात आले आहे. सांस्कृतिक कार्यक्रमद्वारे आदिवासी समाजाचे उत्थान व्हावे हा मुळ हेतू या भवनाचा आहे. परंतु या ठिकाणी मंदिरांची निर्मिती करण्यात येणार असल्याचे समजते आहे. तसे झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा, बिरसा फायटर्सने दिला आहे. याबाबत नगरपालिका प्रशासनास निवेदन देण्यात आले आहे.

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

निवेदनात म्हटले आहे की, आदिवासी सांस्कृतिक भवनात शिवमंदिर बांधकाम सुरू असल्याचे चर्चा परिसरात आहे. मुळात भवनाला आदिवासी सांस्कृतिक भवन नाव दिले आहे आणि भवनाताच शिवमंदिर बांधण्यात येत आहे, हे मोठे षडयंत्र आहे. मुळात आदिवासींची संस्कृती निसर्गाच्या निगडित आहे. निसर्गाला आपले दैवत मानतो व आदिवासींचे सर्व देव निसर्गाच्या निगडित आहे. काही वर्चस्ववादी लोकांकडून आदिवासी मूळ सांस्कृतिक ओळख नष्ट करण्यासाठी असे कट कारस्थान केले जात असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.

हे सुध्दा वाचा

नंदुरबारात ९ वर्षात विकासाला गती : कोट्यवधींची कामे – MDTV NEWS

कामगारांना कामाच्या ठिकाणी मिळणार मध्यान्ह भोजन : पालकमंत्री डॉ.गावित – MDTV NEWS

“मोदी सरकारचे नऊ वर्ष” … तळोद्यात पदाधिकाऱ्यांनी दिला कामाचा आढावा – MDTV NEWS

निवेदनात पुढे म्हटले आहे की, या प्रकाराबाबत आदिवासींमध्ये संतापाची लाट आहे. आदिवासी समाज हा सर्व देवधर्माचे सन्मान करतो परंतु आदिवासी सांस्कृतिक भवनामध्ये मंदिर कशासाठी बांधायचे. बांधायचे असेल तर विद्यार्थ्यांसाठी एक भव्य वाचनालय किंवा आदिवासींचे कुलदैवत अन्नदेवता या मोगी मातेचे मंदिर बांधा.

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

हे सुध्दा वाचा

नंदुरबारात ९ वर्षात विकासाला गती : कोट्यवधींची कामे – MDTV NEWS

कामगारांना कामाच्या ठिकाणी मिळणार मध्यान्ह भोजन : पालकमंत्री डॉ.गावित – MDTV NEWS

“मोदी सरकारचे नऊ वर्ष” … तळोद्यात पदाधिकाऱ्यांनी दिला कामाचा आढावा – MDTV NEWS

आदिवासी सांस्कृतिक भावनात सुरू असलेल्या शिवमंदिर बांधकाम त्वरित थांबवण्यात यावे, अन्यथा बिरसा फायटर, आदिवासी संघटना व समाज बांधव बेमुदत आंदोलन करतील असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे. निवेदनावर बिरसा फायटरचे जिल्हाध्यक्ष भरत पावरा, तालुकाध्यक्ष सुभाष पावरा, जिल्हा कार्याध्यक्ष हिरामण खर्डे, अक्कलकुवा तालुकाध्यक्ष मानसिंग पाडवी, तालुकाध्यक्ष प्रदीप पटले, उत्तम पाडवी, दिनेश पाडवी, गिरीश पावरा, वसंत पावरा, विजेंद्र पाडवी, सुरेश पावरा आदींनी सह्या आहेत. निवेदनाची प्रत आमदार राजेश पाडवी, माजी मंत्री पद्माकर वळवी, माजी आमदार उदेसिंग पाडवी, माजी नगराध्यक्ष व नगरसेवक यांना पाठविण्यात आली आहे.

नितीन गरुड. एमडी.टीव्ही. न्युज, तळोदा ग्रामीण

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here