आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून नवीन शहर कार्यकारणी गठीत करणार- डॉ.अभिजीत मोरे

0
209

नंदुरबार : २७/०२/२०२३

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ घातल्यात..

त्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात देखील शहर कार्यकारिणी बदलाच्या हालचालींना सुरुवात झाली आहे.

त्याबाबत नंदुरबार जिल्हा अध्यक्ष डॉक्टर अभिजीत मोरे यांनी पत्र परिषदेत माहिती दिली.

ncp press
01

नंदुरबार शहर कार्यकारिणी बरखास्त करण्यात येत असून लवकरच नव्या कार्यकारिणीची घोषणा होईल असं देखील मोरेंनी म्हटलं.

नंदुरबार जिल्ह्यात काही ठिकाणी निराशा जनक कामगिरी झाल्याचा आक्षेप प्रदेश कार्यालयाने नंदुरबार जिल्हा अध्यक्ष अभिजीत मोरे यांच्याकडे नोंदवला.

नंदुरबार जिल्ह्याला प्रदेश कार्यालयाकडून क्रियाशील सभासद नोंदणीचे टार्गेट देण्यात आले होते. त्यानुसार दीड वर्षांपासून क्रियाशील सभासद नोंदणी सुरू होती.

त्यानुसार डॉक्टर मोरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची नंदुरबार शहर कार्यकारणी नवीन गठीत करण्याचा निर्णय घेतलाय. आगामी निवडणुकीसाठी योग्य निर्णय असून लवकरच नूतन कार्यकारणी गठीत होईल अशी त्यांनी या वेळी नमूद केलं. ऐकूया डॉक्टर मोरे नेमकं काय म्हटले..

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष प्रदीप वना पाटील यांनी चार महिन्यापूर्वीच पदाचा राजीनामा दिला आहे.तसेच शहराध्यक्ष पदही रिक्त असल्याने हे दोन्ही रिक्त पदे लवकरच नियुक्ती करण्यात येतील अशी माहिती डॉ.अभिजित मोरे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे .ऍडव्होकेट प्रकाश भोई यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते .

हिरालाल मराठे एम.डी .टी.व्ही न्यूज प्रतिनिधी नंदुरबार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here