सातारा -१/५/२०२३
Amol Kolhe Injured: अभिनेते आणि राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्याबाबत या गंभीर घटना घडली आहे.
कराड येथे ‘शिवपुत्र संभाजी’ या नाटकाच्या प्रयोगादरम्यान त्यांचा अपघात झाला असून त्यांना गंभीर दुखापत झाल्याची माहिती समोर येत आहे.
त्यावेळी त्यांच्या पाठीला मार बसला. या अपघाताबाबत अमोल कोल्हे यांनी स्वत: व्हिडीओ शेअर करत माहिती दिली आहे.
सध्या डॉ. अमोल कोल्हे यांच्या ‘शिवपुत्र संभाजी’ या महानाट्याचे महाराष्ट्र भरात जोरदार प्रयोग सुरू आहेत.
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
औरंगाबाद , कोल्हापूरनंतर आता हा दौरा कराड मध्ये आला आहे. पण कराड मध्ये प्रयोग सुरू असताना अमोल कोल्हे यांना गंभीर दुखापत झाली आहे
रविवारी रात्री कराड येथे शिवपुत्र संभाजी महानाट्याच्या प्रयोग सुरू होता. सगळं काही सुरळीत पार पडत होते पण अमोल कोल्हे यांची घोड्यावरून एन्ट्री होत असतानाच घोड्याचा पाय दुमडला गेला. ज्यामध्ये अमोल कोल्हे घोड्यावरून खाली कोसळले. यामुळे त्यांच्या पाठीला जबर मार बसला.
केवळ १ मे महाराष्ट्र दिनी होणारा ‘शिवपुत्र संभाजी’ महानाट्याचा कराडमधील प्रयोग होणार असून उर्वरित दोन्ही प्रयोग रद्द करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. या घटनेमुळे अमोल कोल्हे चांगलेच चर्चेत आले आहेत.
अमोल कोल्हे यांनी स्वतः याबाबत माहिती दिली आहे.
दुखापत झाली असली तरी १ मे रोजीचा प्रयोग करण्याचा निर्धार डॉ. अमोल कोल्हे यांनी व्यक्त केला.
पुढे दोन ओरययोग रद्द झाले असले तरी ११ मे पासून पिंपरीतील एच.ए. मैदानावरील प्रयोग तितक्याच तडफेने सादर केले जाणार आहेत.
एम डी टी व्ही न्यूज ब्युरो , सातारा