डॉ. बाबासाहेब आंबेडकर होते म्हणून आपण आहोत – उत्सव समिती सचिव अजय कढरे

0
110

धुळे -१५/४/२३

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी फक्त एका जाती समाजापुरते काम केले नाही‌ त्यांनी भारतातील सर्वांसाठी काम केलं आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर होते म्हणून आपण आहोत. बाबासाहेबांच्या आदर्श डोळ्यासमोर ठेवावा.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्वांना समता, स्वातंत्र्य आणि बंधुता दिली. असे प्रतिपादन दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया शिरपूर शाखा सभासद आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर उत्सव समिती सचिव अजय कढरे यांनी केले.
अजय कढरे पुढे म्हणाले की, भारतामध्ये सर्वांना समानतेच्या अधिकार बाबासाहेबांमुळे मिळाला आहे.
आता आपण जुन्या रूढी परंपरा विसरायला हव्यात म्हणजे जसं परंपरेने चालून आले त्याच प्रकारे चालू ठेवावे असे नाही त्याच्यातलं सत्य आता ओळखायला हवं, आपल्यासाठी एवढा कठीण काळात कोणीही आलं नाही फक्त आणि फक्त डॉ बाबासाहेब आंबेडकरच आले.
त्यामुळे बाबासाहेबांचे विचार आपण आचरणात आणले पाहिजे, बाबासाहेबांमुळे सर्व महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून पुढे जात आहेत. बाबासाहेबांनी त्यांच्यासाठी हिंदू कोड बिल लिहिले.

बोलताना विचार करा बोलून विचारात पडू नका असे बाबासाहेबांचे विचार होते. असेही अजय कढरे याप्रसंगी म्हणाले.

शिरपूर तालुक्यातील टेंभे येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

tembhe1
1
tembhe1.jpg2
2
tembhe3
3
tembhe4
4

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा.

https://bit.ly/3UoK7E0

तालुक्यातील टेंभे बुद्रुक येथे 14 एप्रिल 2023 रोजी भिमजयंती निमित्त भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारताचे निर्माते महामानव विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा फलकाचे पूजन करून मानवंदना देण्यात आली.
व टेंभे बुद्रुक येथील ग्रामपंचायत मध्येही बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रतिमा पूजन करण्यात आले.
याप्रसंगी सर्व जनतेस जयंतीच्या शुभेच्छा देत जय भिम व डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या विजय असो अशा घोषणा देण्यात आल्या.

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन सरपंच प्रतिनिधी देविसिंग राजपूत व ग्रामसेवक धनराज पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी गावातील पदाधिकारी व समाज बांधवांनी बाबासाहेबांचे प्रतिमा पूजन करून मानवंदना दिली.

14 एप्रिलच्या रात्री 12 वाजेला समाज महिलांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे गाणे म्हणून मानवंदना दिली व फटाके फोडून जय भीम व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विजय असो अशा घोषणा देण्यात आल्या.
यावेळी देखील मोठ्या संख्येने समाज बांधव व महिला उपस्थित होते.

याप्रसंगी गावातील नागरिकांना महामानव डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन पटातील काही महत्वपूर्ण घटना, त्यांनी विद्यार्थी दशेतील शिक्षणासाठी केलेला संघर्ष, समाजात पसरलेली जातीय विषमता, अनिष्ट रूढी परंपरा नष्ट करण्यासाठी केलेले प्रयत्न व संविधान जनजागृती याबाबत दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया, शिरपूर शाखा चे मेम्बर अजय नवल कढरे यांनी मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमासाठी सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार नवल कढरे, माजी सरपंच सुरेश वगर कढरे, सरपंच प्रतिनिधी देविसिंग राजपूत, ग्रामसेवक धनराज पाटील, माजी उपसरपंच प्रतिनिधी सदु बाबु कढरे, दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया, शिरपूर शाखा सभासद तथा डॉ बाबासाहेब आंबेडकर उत्सव समिती सचिव अजय नवल कढरे, उत्सव समिती अध्यक्ष निलेश कढरे, उपाध्यक्ष भाऊसाहेब ढोढरे, सदस्य मोहन कढरे, मनोहर कढरे,आदी गावातील पदाधिकारी, नागरिक व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नवल कढरे ,शिरपूर प्रतिनिधी ,एम डी टी व्ही न्यूज

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here