धुळे :१२/४/२३
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त उत्सव समिती टेंभे बु ची कार्यकारीणी गठीत करण्यात आली. त्यात अध्यक्षपदी निलेश झगडू कढरे तर सचिवपदी अजय नवल कढरे यांची निवड करण्यात आली.
शिरपूर तालुक्यातील टेंभे बु येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे बैठक घेण्यात आली.
यावेळी १४ एप्रिल रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त मानवंदना कार्यक्रम व २० एप्रिल रोजी गावात मिरवणूक काढून जयंती जल्लोषात साजरी करण्याचे नियोजन करण्यात आले.
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा.https://bit.ly/3UoK7E0
उत्सव समिती कार्यकारिणी :
अध्यक्ष निलेश झगडू कढरे, सचिव अजय नवल कढरे, उपाध्यक्ष सुरेश अशोक कढरे, भाऊसाहेब दिलीप ढोढरे, कोषाध्यक्ष दिनेश ईश्वर कढरे, खजिनदार गौतम नाना कढरे, सदस्य भैय्या सुरेश कढरे, मोहन भिमराव कढरे, सागर संजय कढरे, मनोहर छोटू कढरे, महिला सदस्य अंजना भैय्या कढरे यांची निवड करण्यात आली.
या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.
नवल कढरे ,प्रतिनिधी ,शिरपूर ,एम डी टी व्ही न्यूज