नंदुरबार -३/६/२३
नुकतंच माध्यमिक शालान्त परीक्षेचा निकाल ऑनलाईन काल जाहीर करण्यात आला ..
नंदुरबारातील डॉ काणे गर्ल्स शाळेने यंदाही १० विच्या परीक्षेत निकालात अव्वल स्थान कायम राखत यशस्वी घोडदोड केलीय ..
त्यात शाळेतील मार्गदर्शक संस्थेचे पदाधिकारी यांच्यासह मुख्याध्यापिका सीमा मोडक,त्यांचे सर्व शिक्षक -शिक्षिका यांचं मार्गदर्शन लाभलं
नंदुरबार एज्युकेशन सोसायटी नंदुरबार संचलित डॉ काणे गर्ल्स हायस्कूल, नंदुरबार येथे एस.एस.सी. परीक्षा मार्च २०२३ परीक्षेत विद्यार्थिंनी घवघवीत यश मिळवून शाळेचा ९९.२७ टक्के निकाल लागला.
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
एस.एस.सी. परीक्षा मार्च २०२३ एकूण १३८ विद्यार्थिनी प्रविष्ट झाल्या होत्या.
पैकी १३७ विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या असून शाळेचा निकाल ९९.२७ टक्के लागला.
त्यात बजाज जान्हवी रमेश ही विद्यार्थिनी ९६.६० टक्के गुण मिळवून शाळेतून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाली ,
द्वितीय क्रमाक राक्षे प्राची बाबासाहेब ९५.८० टक्के, तृतीय क्रमांक लांबोळे तनिष्का घनश्याम ९४.४०,चतुर्थ क्रमांक वाडेकर तनुष्का दिनेश ९४.२० टक्के व पंचम क्रमांक पाटील निलीमा दिपक ९३.० टक्के, तसेच १० विद्यार्थीनींनी ९० टक्के पेक्षा जास्त गुण प्राप्त केले. २४ विद्यार्थिनी ८५ ते ८९ गुण प्राप्त, विशेष प्राविण्य ६७ , प्रथम श्रेणी ३२ व द्वितीय श्रेणीत ४ विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या.
यशस्वी विद्यार्थिनींचे नंदुरबार एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन . अँड. परिक्षित मोडक, अध्यक्ष मा.नरेंद्र सराफ, उपाध्यक्ष .राहुल पाठक, सचिव प्रशांत पाठक सर्व कार्यकारणी सदस्य /सदस्या जनरल बाँडी सदस्य, शाळेच्या मुख्याध्यापिका .. सीमा मोडक, पर्यवेक्षक श्रीराम मोडक, सर्व शिक्षक बंधू-भगिनी व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थिनींचे अभिनंदन व कौतुक केले.
नारायण ढोडरे,प्रतिनिधी ग्रामीण ,नंदुरबार