ट्रक ट्रॉलीला धडकल्याने चालकाचा मृत्यू

0
140

नंदुरबार : शहादा ते प्रकाशा रस्त्यावर ट्रक अवजड मशिनरी वाहून नेणाऱ्या ट्रॉलीला धडक दिल्याने ट्रक चालकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली.

हरियाणा राज्यातील रेवाडी जिल्ह्यातील बावल येथील संदिपकुमार महाविरसिंग जाट हा त्याच्या ताब्यातील ट्रक ट्रॉलीमध्ये (क्र.जी.जे. ०१ केटी १९५१) अवजड मशिनरी साहित्य बाहेर असलेल्या अवस्थेत घेवून जात होता.

यावेळी लालजी सामदभाई गुजरीया (वय ३२, रा.काबुदर ता.राजूला गुजरात) हे त्यांच्या ताब्यातील ट्रक (क्र.जी.जे.०४ एक्स ५९६७) शहादा-प्रकाशा रस्त्याने घेवून जात असतांना ट्रकट्रॉलीमधील बाहेर निघालेल्या अवजड मशिनरी साहित्याला धडक दिल्याने ट्रक रस्त्याच्या साईडपट्ट्यालगत असलेल्या चारीत उलटली. यात लालजी सामदभाई गुजरिया गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला.

याबाबत सहचालक अशोक पाताभाई गुजरीया यांच्या फिर्यादीवरुन शहादा पोलिस ठाण्यात संदिपकुमार जाट याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश पवार करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here