नंदनगरीत दुमदुमला शिवरायांचा जयघोष..

0
268

नंदुरबार : १०/३/२०२३

आज १० मार्च रोजी तिथीनुसार शिवजयंती साजरी करण्यात आली ..

त्याचा उत्साह नंदनगरीत ओसंडून वाहतांना रॅलीतून अनुभवास आला ..

हातात भगवे ध्वज आणि डोक्यावर भगवे फेटे परिधान करून तालबद्ध लेझीम नृत्य करीत जय शिवाजी… जय भवानी च्या गजरात मिरवणुका काढून नंदुरबारात शिवजन्मोस्तव उत्साहात साजरा करण्यात आला.

यावेळी मोठ्या प्रमाणात महिलांनी सहभाग घेतला..

पारंपारिक लेझीम खेळत शांततापूर्ण वातावरणात रात्री उशिरापर्यंत मिरवणुका सुरू होत्या..

पाहू या सविस्तर मिरवणुकीची हि दृश्ये फक्त एम डी टी व्ही न्यूजवर ..

01

पाहू या नंदनगरीतील जल्लोष शिवजयंतीचा .. उत्साह तरुणाईचा ..
शहरातील विविध मंडळ, संस्था यांच्यातर्फे मिरवणुका काढण्यात आल्याने शहरातील वातावरण भगवेमय झाले होते..
अनेक ठिकाणी प्रतिमा पूजन करून छत्रपती शिवरायांना अभिवादन करण्यात आल.

शहरातील माळीवाडा परिसरातून निघालेल्या मिरवणुकीने जनतेचे लक्ष वेधून घेतले.

पोलीसांनी चोख बंदोबस्त ठेवल्याने सर्व मिरवणुका शांततेत पार पडल्या.
विदेशी पर्यटकांनी देखील जय शिवाजी च्या घोषणा घोषणा देत सर्वांचं लक्ष वेधलं ..
पाहू या हा व्हिडिओ ..

02

शहरातील माळीवाडा परिसरातून सजवलेल्या ट्रॅकटर वरून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य पुतळ्याची मिरवणूक काढण्यात आली.

यावेळी महिला व शिवप्रेमींनी मिरवणुकीत सहभाग घेतला
भगवे फेटे, भगव्या साड्या नेसून तर तरुणांनी भगवा कुर्ता व हातात भगवा ध्वज घेत केलेले लेझीम नृत्य हे मिरवणुकीचे आकर्षण ठरत होते.

याठिकाणी विदेशी पर्यटकांनी शिवरायांना अभिवादन करीत जय शिवाजीच्या घोषणा दिल्याने मिरवणुकीत अधिक उत्साह दिसून आला..
जीवन पाटील कार्यकारी संपादक एम डी टी व्ही न्यूज

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here