शेगावमध्ये मोठ्या थाटामाटात दुर्गा उत्सव साजरा केला | Durga festival was celebrated in Shegaon

0
277
Durga festival was celebrated in Shegaon

शेगाव: (Shegaon)तालुक्यातील पहुरजीरा येथे यशवंत नवदुर्गा उत्सव मंडळाने दरवर्षी प्रमाणे यंदाही गणपती उत्सव सोबतच दुर्गा उत्सव मोठ्या आनंदाने साजरा केला. नऊ दिवस चाललेल्या या उत्सवात गावकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला.

उत्सवानिमित्त मंडळाने विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले. लेझीम, वेशभूषा करून देवी देवतांच्या इतिहासाची जाणीव करून देणे, भारुळाचे कार्यक्रम असे विविध कार्यक्रम सादर केले.

download

उत्सवाच्या शेवटच्या दिवशी विसर्जन मिरवणूक मोठ्या थाटात काढण्यात आली. मिरवणुकीत लेझीम पथक, वेशभूषाधारी लोक, गावातील नामांकित सांस्कृतिक कलाकार शिवदास इंगळे यांच्या भारुळाच्या कार्यक्रमाने मिरवणुकीला भव्यता आणली.

उत्सवात मंडळाचे अध्यक्ष सोपान व्यवहारे, उपाअध्यक्ष गोपाल अंजुळकर, कोषाध्यक्ष अजय व्यवहारे, सर्व सदस्य सुरेश बुंदे, गोपाल बुंदे, सागर साळसुंदर, गोलू व्यवहारे, किसना अंजुळकर, किसना माळोकार, आत्माराम अहिर, देवेंद्र तळपते, समाधान देवकर, शुभम सुलोकर, विलास व्यवहारे, संतोष दिघडे, गणेश दिघडे, संजू पारस्कर, रामेश्वर व्यवहारे, मनोज व्यवहारे, पवन डोंगरे, गणेश पारस्कर, गजानन साळसुंदर, संजय बुंदे, दत्ता पारस्कर, दिगांबर बुंदे, वसुदेव वानखडे, शिवदास इंगळे, प्रकाश माळोकार व शेकडो गावकरी हजर होते.

पुरुषोत्तम कौसकार बुलढाणा जिल्हा प्रतिनिधि

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here