महादेव बेटिंग (Mahadev Betting Scam) घोटाळ्याप्रकरणी ईडीने रणबीर कपूर (Ranbir Kapoor), श्रद्धा कपूर, कपिल शर्मा यांच्यासह अनेक बॉलिवूड (Bollywood) कलाकारांना समन्स बजावले आहे.
काही कलाकार अजूनही ईडीच्या रडारवर आहेत. या सेलिब्रिटींची चौकशी होणार असल्याने बॉलीवूडमध्ये खळबळ उडाली असतानाच आता अशी बातमी समोर आली आहे की, ज्यामुळे बॉलिवूडकरांची झोप उडाली आहे.
ईडीने मुंबईतील कुरेशी प्रॉडक्शन हाऊसवर छापा टाकला आहे. या कुरेशी प्रॉडक्शन हाऊसच्या माध्यमातून आर्थिक व्यवहार झाल्याचा आरोप आहे, त्यामुळे खळबळ उडाली आहे.
एका राजकीय पक्षाशी संबंधित असलेल्या वसीम कुरेशीचे हे प्रोडक्शन हाऊस असल्याचे सांगण्यात येत आहे. गेल्या महिन्यात ईडीने वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकून ४१७ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली होती.
या तपासणीत एकूण ५ हजार कोटींचा भ्रष्टाचार समोर आला आहे. हे अॅप चालवणाऱ्या सौरभ चंद्राकरवर अनेक कलाकारांना हवालाद्वारे पैसे दिल्याचा आरोप आहे.