(कोठार ता.तळोदा येथे बिरसा फायटर्सची ३३१ वी शाखेचे उदघाटन)
तळोदा:-कोणत्याही समाजाचे शिक्षणच खरे विकासाचे साधन आहे.पालकांनी आपल्या मुलांच्या शिक्षणाकडे अधिक लक्ष दिले पाहिजे.विदयार्थ्यांची शैक्षणिक प्रगती होण्यासाठी आपल्या गावातील शाळेकडे,शिक्षकांकडे ग्रामस्थांनी अधिक लक्ष द्यावे;असे उपस्थित पालकांना आवाहन केले.
यावेळी कोठार-तोलाचापड ता.तळोदा येथे बिरसा फायटर्सची ३३१ वी शाखा घोषित करण्यात आली.शाखाध्यक्ष गोरख पाडवी,उपाध्यक्ष नरपत नाईक, सचिव मोतीलाल पाडवी,संघटक प्रशांत पाडवी,सल्लागार कुंदन पाडवी,कार्याध्यक्ष वरदान पाडवी,सह सचिव राजेश पाडवी,कोशाध्यक्ष किरण वसावे,सहसंघटक हिरालाल नाईक यांना महासचिव राजेंद्र पाडवी नियुक्तीपत्र देऊन शाखा घोषित करण्यात आली.
यावेळी जिल्हाध्यक्ष भरत पावरा,जिल्हा संघटक यशवंत वळवी यांनी उपस्थित ग्रामस्थांना संघटनेचे महत्त्व, उद्देश,कामे,संस्कृती,आदिवासींवरील संकटे याविषयी मार्गदर्शन केले.यावेळी तालुका सहसंघटक कालूसिंग पावरा,रोझवा पुनर्वसन शाखाध्यक्ष बारक्या पावरा,गुलाब पाडवी,चंद्रसिंग पाडवी,अरविंद वळवी,ओल्या नाईक,मगन पाडवी,कृष्णा पाडवी व मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. मोतीलाल पाडवी यांनी आभार मानले.
MD TV न्यूज तळोदा प्रतिनिधी महेंद्र सूर्यवंशी…