शिक्षण अधिकाऱ्यासह वरिष्ठ सहायकाला लाच घेताना अटक | Education officer along with senior assistant arrested for taking bribe

0
1271
Education officer along with senior assistant arrested for taking bribe

जिल्हा परिषदेतील शिक्षण विभागात गुरुवारी (arrested for taking bribe ) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने कारवाई केली. शिक्षणाधिकारी राकेश साळुंखे आणि वरिष्ठ सहायक विजय पाटील यांना लाच घेताना अटक करण्यात आली.

या कारवाईमुळे शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

तक्रारदार शिक्षक हा जिल्हा परिषदेच्या रामपुरा शाळेत उपशिक्षक आहे. त्याची पेसा क्षेत्रातून नॉन पेसा क्षेत्रात बदली होण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने आदेश पारित केला होता.

तक्रारदाराने मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे बदलीसाठी विनंती अर्ज सादर केला. त्यावर सीईओ यांनी “सहानभूतीपुर्वक विचार करावा”, असा शेरा मारत अर्ज पुढील कार्यवाहीस्तव शिक्षणाधिकारी साळुंखे यांच्याकडे पाठविला होता

download

तक्रारदाराने वेळोवेळी शिक्षणाधिकाऱ्यांची भेट घेऊन बदली अर्जावर कार्यवाहीसाठी पाठपुरावा केला. यादरम्यान शिक्षणाधिकाऱ्याने तक्रारदारास त्याचा बदली अर्ज शिफारशीसह जिल्हा परिषदेत सामान्य प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्याकडे पाठविण्यासाठी २५ हजार रुपयांची लाच मागितली.

शिक्षण विभागाचा वरिष्ठ सहायक विजय पाटील याने तक्रारदाराच्या बदली अर्जाबाबत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडून बदली आदेश मिळवून देण्यासाठी सामान्य प्रशासन शाखेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी, कार्यालयीन अधीक्षक महाले, पराग धात्रक, शिक्षक व इतर कार्यालयीन कर्मचाऱ्यांसाठी ६६ हजाराची लाच मागितली. या छळामुळे त्रस्त शिक्षकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या धुळे कार्यालयाकडे तक्रार दिली.

तक्रारीच्या अनुषंगाने पडताळणी केली असता शिक्षणाधिकारी साळुंखे याने २५ हजाराची लाच मागत तडजोडीअंती २० हजाराची मागणी करून वरिष्ठ सहायक विजय पाटील यास भेटण्यास सांगितले.

पाटील याने सामान्य प्रशासनाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी, कार्यालयीन अधीक्षक महाले व इतर कार्यालयीन कर्मचाऱ्यांसाठी ६६ हजाराची पंचांसमक्ष लाचेची मागणी करून तडजोडीअंती ५१ हजाराची लाच स्वीकारण्याचे मान्य केले व पहिला हप्ता म्हणून ३५ हजार रुपये स्वीकारताना या संशयितांना पकडण्यात आले.

शिक्षण क्षेत्रातील भ्रष्टाचाराला आळा घालावा

शिक्षण विभागातील दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांना लाच घेताना अटक झाल्याने शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली आहे. यामुळे विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांच्या मनात शिक्षण विभागाबद्दल नाराजी निर्माण झाली आहे.

या घटनेमुळे शिक्षण विभागातील भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी कडक कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई कौतुकास्पद

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने केलेल्या कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे. या कारवाईमुळे शिक्षण विभागातील भ्रष्टाचारावर आळा घालण्यास मदत होईल, अशी अपेक्षा आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here