नंदुरबार : नंदुरबार जिल्हा प्रशासन आणि सेंटर फॉर लर्निंग रिसोर्सेस व लीडरशिप फॉर इक्विटी या स्वयंसेवी संस्थांच्यावतीने नंदुरबार येथे एक दिवशीय आरोग्य,शिक्षण आणि कृषी या क्षेत्रात नंदुरबार जिल्ह्याने केलेले पथदर्शक प्रकल्प या विषयांवर शैक्षणिक परिषद संपन्न झाली.
या परिषदेस नाशिक विभागाचे विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे (दूरदृष्य प्रणाली), जिल्हाधिकारी मनीषा खत्री, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, नाशिक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल (दूरदृष्य प्रणाली), जळगाव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पंकज आशिया (दूरदृष्य प्रणाली), सहायक जिल्हाधिकारी मीनल करनवाल, मंदार पत्की यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
परिषदेत नंदुरबार जिल्ह्यात अलीकडच्या काळात आरोग्य, शिक्षण आणि कृषी क्षेत्रात राबविल्या गेलेल्या नाविण्यपूर्ण यशस्वी प्रकल्पांचे सादरीकरण यावेळी करण्यात आले. कार्यक्रमात आरोग्य, शिक्षण आणि कृषी या विषयावर परिसंवाद पार पडले. यात नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी आरोग्यासंबंधी, जळगाव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पंकज आशिया यांनी शिक्षणसंबंधी तर कृषी विषयाशी संबंधित परिसंवादामध्ये वनमती, नागपूर प्रकल्पाच्या संचालक मिताली सेठी यांनी तर महिला आणि बाल विकास मंत्रालयाच्या अंतर्गत महिला आर्थिक विकास महामंडळाच्या (माविम) व्यवस्थापकीय संचालक इंदू जाखर यांनी सहभाग घेतला.
वरील तीनही क्षेत्रात उल्लेखनीय प्रकल्प राबवणाऱ्या अधिकारी, शेतकरी, शिक्षक, अंगणवाडी सेविकांना गौरवचिन्ह व प्रमाणपत्र देऊन मान्यवराच्या हस्ते सन्मान करण्यात आला. परिषदेत प्रशासकीय प्रतिनिधी, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, धोरणे ठरवणारे, अंमलबजावणी करणारे, तज्ञ मंडळी तसेच सर्व भागधारक एकत्र येवून त्यांच्या वैचारिक देवाण घेवाणीतून आणि यशस्वी प्रकल्पांच्या माध्यमातून, आरोग्य, शिक्षण आणि कृषी क्षेत्रात जिल्ह्यांच्या पुढील वाटचालीकरीता दिशा व धोरणे ठरविण्यावर चर्चा करण्यात आली.
प्रारंभी जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांच्या हस्ते दीप प्रज्वलन होऊन कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. यावेळी नाशिक विभागाचे विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दूरदृष्य प्रणालीवरुन मार्गदर्शन केले. यावेळी जिल्हाधिकारी मनीषा खत्री तसेच नंदुरबार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
यावेळी महिला व बाल कल्याण क्षेत्रात सारीका दादर,( अंगणवाडी पर्यवेक्षक ), बबीता पाडवी, ( अंणवाडी सेविका ). कृषी क्षेत्रात रोशन बोरसे, योगेश पाटील, दिलीप पाडवी व धनराज पाडवी. शिक्षण क्षेत्रात अनिता पाटील, निर्मल माळी, रुपाली गोसावी, राजेश भावसार. आरोग्य क्षेत्रात डॉ.रोशनी पाटील, डॉ.हितेश सुगंधी, मनीषा पाडवी, (परीचालिका ) उषा ठाकरे ( आशा नर्स ), कृष्णा पावरा यांचा सन्मान करण्यात आला.
एम.डी.टी.व्ही. न्युज ब्युरो नंदुरबार