शिंदखेडा /धुळे -२४/४/२३
येथील रमजान ईद निमित्त वरपाडे रोडवरील ईदगाह वर नमाजपठण कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर ईद मुबारक हिंदू बांधवांनी तर अक्षय तृतीया च्या शुभेच्छा दिल्या ..
मुस्लिम बांधवांनी शुभेच्छा देवुन जातिय सलोखा कायम ठेवला. सुरुवातीला नमाजपठण कार्यक्रम झाल्यावर शिंदखेडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनील भाबड यांच्या सह कर्मचारी तसेच नगरपंचायत गटनेते रावसाहेब अनिल वानखेडे, माजी उपनगराध्यक्ष भिला पाटील, प्रकाश देसले, भाविमो जिल्हाध्यक्ष सुरज देसले, प्रकाश चौधरी, दिपक चौधरी, चेतन परमार, अँड विनोद पाटील, अरुण देसले, पंकज कौठळकर, गुलाब सोनवणे, शहराध्यक्ष प्रवीण माळी, विविध कार्यकारी सोसायटी चे चेअरमन दगा चौधरी यांच्या सह वंचित बहुजन आघाडीचे इक्बाल तेली, समाजवादी पार्टी जिल्हाध्यक्ष डॉ इंद्रिश कुरेशी, विक्की खाटीक, समद शेख,नजीर शेख उपस्थित होते ..
यांसह हिंदू मुस्लिम बांधवांनी ईद मुबारक आणि आखाजीच्या शुभेच्छा दिल्या.
ह्यावेळी नगरपंचायत व भाजपाच्या वतीने ज्युस वाटप करण्यात आले.
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा.
शिंदखेडा शहरातील देसले परिवारातर्फे ४२ वर्षाची परंपरा कायम ठेवली असुन शिवाजी चौकातील माजी सभापती प्रा सुरेश देसले यांच्या निवासस्थानी ईद मुबारक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता
ह्यावेळी माजी विरोधी पक्षनेते सुनील चौधरी, अँड निलेश देसले, समद शेख, किरण थोरात, पंकज देसले, यांच्या सह पदाधिकारी उपस्थित होते.
हयावेळी समस्त मुस्लिम बांधवांना रसनाचं सरबत वाटप करण्यात आले.
मुस्लिम व हिंदू बांधवांनी रमजान ईद हा सण तर अक्षय तृतीया हा हिंदू चा सण एकाच दिवशी आल्याने जातीय सलोखा निर्माण करित शहरात पुर्वीपासूनचा पायंडा कायम अबाधित राखण्यासाठी दोन्ही समाजातील वरीष्ठ नेत्यांनी पुढाकार घेतला होता.
यादवराव सावंत ,शिंदखेडा प्रतिनिधी ,एम डी टी व्ही न्यूज