Eknath Shinde बॉम्ब फोडला 50 कोटी ; सांगितला किस्सा…

0
2322
Eknath Shinde

मुख्यमंत्री Eknath Shinde शिंदेंनी हॉटेल हयातमधील सांगितला किस्सा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर नाव न घेता जोरदार निशाणा साधला. शिंदे यांनी यावेळी 50 खोक्यांच्या मुद्द्यावरुन ठाकरे गटावर हल्लाबोल केला.

Eknath Shinde

क्षणाचाही विलंब न करता 50 कोटी दिले

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, निवडणूक आयोगाच्या निकालानंतर ठाकरे गटाकडून आपल्याला 50 कोटी रुपयांची मागणी करण्यात आली. आपण क्षणाचाही विलंब न करता ते 50 कोटी रुपये देवून टाकले. अशी माहित शिंदे यांनी सभागृहात दिली. तर यावेळी त्यांनी सभागृहात संबंधित पत्र देखील दाखवलं. यावेळी त्यांनी ठाकरे गटावर निशाणा साधताना ग्रँड हयात हॉटेलच्या किस्स्याची आठवण काढली. यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचाही उल्लेख केला.

हे पण वाचा –

एकनाथ शिंदेंना निवडणूक आयोगाने शिवसेना व पक्ष चिन्ह बहाल केले. त्यानंतर शिवसेना पक्षाच्या खात्यात असलेले 50 कोटी रुपये आम्हाला परत द्यावेत, अशी मागणी ठाकरे गटाकडून करण्यात आली. आता ते पैसे एकनाथ शिंदे यांनी परत केले आहेत. यावरून शिंदेंनी ठाकरेंना टोला लगावला. ‘खरा पक्ष आमचा, धनुष्यबाण आमचा, तरी शिवसेनेच्या बँक खात्यात असलेले 50 कोटी यांनी आमच्याकडे मागितले, माझ्याकडे हे पत्र आहे,’ असे ते म्हणाले

‘आम्हाला रोज शिव्या शाप देतात, गद्दार म्हणतात. आमच्यावर 50 खोकेचे आरोप करतात आणि आम्हालाच 50 कोटी रुपये परत करा म्हणून पत्र लिहितात. मग खरे खोके बाज आणि धोकेबाज कोण? मी एका मिनिटाचाही विचार न करता पैसे परत देऊन टाकायला सांगितलं. मी अगोदरच सांगितलं होतं तुमची संपत्ती तुमची प्रॉपर्टी तुमचं काही आम्हाला नको, बाळासाहेबांचे विचार हीच आमची संपत्ती आहे,’ असा घणाघात मुख्यमंत्र्यांनी केला.

हे पण वाचा –

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here