एकनाथ शिंदे यांनी रात्री घेतला धक्कादायक निर्णय..

0
212

मुंबई -२०/४/२३

सरकारने महाराष्ट्र शासनाच्या अभ्यासक्रमाच्या शाळा वगळता राज्यातील इतर शाळा आणि अभ्यासक्रमात मराठी विषय सक्तीचा करण्याच्या निर्णयाला तीन वर्षासाठी स्थगिती दिली आहे..

सीबीएससी ,आयसीएससी, केंब्रिजच्या शाळांमध्ये आठवी नंतरच्या इयत्तांना मराठी विषय श्रेणी पुरताच राहणार आहे..

ठाकरे सरकारने एक जून 2020 ला महाराष्ट्रातील सर्व परीक्षा मंडळाच्या अभ्यासक्रमात मराठी भाषेचे अध्यापन आणि अध्ययन सक्तीचे केले होते..

शिंदे सरकारने मराठीची सक्ती हटवली..

राज्य सरकारच्या या निर्णयामुळे अनेक मराठी भाषी प्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे.

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा.

https://bit.ly/3UoK7E0

सरकारकडून अधिकृतपणे शासन निर्णय काढत स्पष्ट करण्यात आलं आहे. CBSE, ICSE, केम्ब्रिजच्या शाळांमध्ये म्हणजे पुढील तीन वर्षांकरिता मराठी भाषा केवळ ‘श्रेणी’ पुरतीच मर्यादित राहणार आहे. म्हणजेच मराठी विषयाचे गुण एकूण मूल्यांकनात धरण्यास तीन वर्षांकरिता स्थगिती देण्यात आली आहे.

महाराष्ट्र शासनाच्या राज्य अभ्यासक्रमाच्या शाळा वगळून राज्यातील इतर परीक्षा मंडळाच्या शाळांमध्ये 2023-24 पासून पुढील तीन वर्षांपर्यंत इयत्ता आठवी, नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांचे मराठी विषयाचे मुल्यांकन करताना श्रेी स्वरुपात (अ,ब,क,ड) केले जावे, असं शासन आदेशात म्हटलं आहे. तसेच सदर मूल्यांकनाचा समावेश या परीक्षा मंडळांच्या इतर विषयांच्या एकत्रित मुल्यांकनामध्ये करण्यात येऊ नये, असं देखील आदेशात म्हटलं आहे.

एम डी टी व्ही न्यूज ब्युरो मुंबई

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here