नंदुरबारात सव्वा लाखाची वीजचोरी उघड..

0
281

नंदुरबार : २३/३/२३

शहरातील वेडू गोविंद नगरात सुमारे सव्वा लाखाची वीज चोरी केल्याप्रकरणी एकाविरोधात गुन्हा दाखल करऱ्यात आला आहे.

नंदुरबार शहरातील वेडू गोविंद नगर येथील वळवी यांनी घरगुती वापरासाठी महावितरणची ८८२० वीज युनिटची सुमारे १ लाख २३ हजार ५१३ रुपये किंमतीची वीज चोरी केली.

याबाबत महावितरणच्या भरारी पथकातील सहाय्यक अभियंता महेशकुमार गोपाळ महाजन यांच्या फिर्यादीवरुन नंदुरबार शहर पोलिस ठाण्यात भारतीय विद्युत कायदा २००३ चे कलम १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भरारी पथकाने केलेल्या धडक कारवाईचं स्वागत करण्यात येतंय ..

जीवन पाटील,कार्यकारी संपादक ,एम डी टी व्ही न्यूज नंदुरबार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here