२६ महिन्यात सव्वादोन लाखाची वीज चोरी

0
133

नवापुरात व्यापाऱ्यावर गुन्हा दाखल

d68da703 3c1a 43b7 aa38 682360a1601d

नंदुरबार : नवापूर शहरात ऑईल फॅक्टरीत सुमारे सव्वादोन लाख रुपयांची वीज चोरी केल्याप्रकरणी मालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, नवापूर शहरातील इंद्रिस रज्जाक खाटीक यांची इस्त्राईल ऑईल नावाची फॅक्टरी आहे.

याठिकाणी वीज वितरणाच्या भरारी पथकाने पाहणी केली असता सदर ऑईल फॅक्टरीत खाटीक यांनी मागील २६ महिन्यामध्ये एकूण २ लाख ३१ हजार ६४० रुपये किंमतिची वीज चोरी केल्याचे आढळून आले.

याबाबत नंदुरबार महावितरण कंपनीचे भरारी पथकातील अतिरीक्त कार्यकारी अभियंता बकुळ रामदास मानवटकर यांच्या फिर्यादीरुन नंदुरबार शहर पोलिस ठाण्यात इंद्रिस रज्जाक खाटीक यांच्याविरोधात भारतीय विद्युत कायदा २००३ चे कलम १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here