BREAKING NEWS – अखेर सात दिवसानंतर कर्मचाऱ्यांनी घेतला संप मागं

0
441

जुनी पेन्शन योजना लागू करा, या मागणीसाठी राज्यभरातील जवळपास १८ लाख सरकारी कर्मचारी सात दिवसांपासून संपावर होते. आज अखेर हा संप मिटला आहे.


सुकाणू समितीच्या शिष्टमंडळाची आज सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक पार पडली. यावेळी जुनी पेन्शन योजना याबाबत चर्चा करण्यात आली.

या बैठकीनंतर संप मागे घेण्याचा निर्णय सरकारी कर्मचाऱ्यांनी घेतला आहे.

कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना पूर्वलक्ष्यी प्रभावाने लागू करण्याच्या मागणीचा प्राथमिक स्तरावर स्वीकार केल्याचं आश्वासन सरकारने दिल्याचंही आंदोलकांच्या समन्वयकांकडून सांगण्यात आले आहे.


मागील सात दिवसांपासून संपामुळे शिक्षण, रुग्णालय, महाविद्यालय, नगर पालिका, जिल्हा परिषद, म्हाडा, तहसील कार्यालय यांसह अनेक सरकारी विभागांचे कामकाज ठप्प होते. संपामुळे अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे देखील रखडले आहेत.

संप मिटल्याने या कामे पूर्ववत होणार असून यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या या निर्णयाचे सर्व स्तरावरून स्वागत करण्यात येत आहे.

जीवन पाटील – कार्यकारी संपादक, एम.डी. टीव्ही नंदुरबार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here