शिंदखेडा,धुळे :२०/३/२३
गेल्या 14 मार्चपासून सरकारी कर्मचारी बेमुदत संपावर बसले आहेत ..
अद्यापही तोडगा न निघाल्याने संप कायम ठेवलाय.. शिंदखेडा पंचायत समिती आवारात कर्मचाऱ्यांनी थाळीनाद करून उपस्थितांचं लक्ष वेधलं..
पंचायत समिती आवारात गेल्या सहा दिवसांपासून बेमुदत संप जुनी पेन्शन योजना मिळावी व इतर अन्य मागण्यांबाबत तालुक्यातील सर्व राज्य शासकीय व निमशासकीय कर्मचारी शंभर टक्के बसले आहेत ..
शासनाला आमचा आवाज पोहचवण्यासाठी आज सातव्या दिवशी थाळीनाद आंदोलन करण्यात आल.
ह्यावेळी पंचायत समिती आवार थाळीनादाने दणाणला होता.
तर गटविकास अधिकारी, सहाय्यक गटविकास अधिकारी, गटशिक्षणाधिकारी सह अधिकारी, विस्तार अधिकारी सहभागी झाले होते.
जोपर्यंत शासन आमच्या मागण्या मान्य करत नाही तोपर्यंत बेमुदत संप सुरूच राहणार असल्याचा इशारा आजही सर्व संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी दिला.
ह्या प्रसंगी गमन पाटील, गिरीश बागुल,सी.जी.बोरसे, रवींद्र आखाडे, लालसिंग गिरासे, प्रवीण कुमावत, कैलास शिंदे, प्रफुल्ल शिंदे, बापू आखडमल, महेंद्र महाजन, रणजित राठोड, शांताराम पाटीलउपस्थित होते ..
विजयसिंग गिरासे, नितीन सासके, रत्नाकर कदम, भुषण चौधरी, नरेंद्र चौधरी, त्रंबक शिंदे, ओमप्रकाश सोनवणे, कपिल वाघ, गोकुळ सोनार, राजेंद्र परदेशी, कृष्णा भदाणे , चंद्रकांत जाधव, जितेंद्र सोनवणे, गोकुळ पाटील, भरत घरटे, सुधीर पाटील, धिरज परदेशी, जितेंद्र चव्हाण, शुभांगी पाटील, तौफिका बी.महम्मद, संगीता मराठे, कविता कोळी, संगीता मिश्रा , भाग्यश्री सोलंकी, सरला पाटील आदींसह तालुक्यातील सर्व संघटनांचे, राज्य कर्मचारी शंभर टक्के बेमुदत संपावर बसले आहेत.
लवकरात लवकर संप सरकारने मिटवून शिष्टमंडळ आणि राज्य सरकार यांच्यात समन्वयाची भूमिका घ्यावी ..
कारण संप मिटत नाही तोपर्यंत सगळी यंत्रणा कोलमडल्याने नागरिकांचे हाल होतायेत ..
यादवराव सावंत, शिंदखेडा प्रतिनिधी एम डी टी व्ही न्यूज