शिंदखेडा छत्रपती शिवाजी महाराज चौफुली येथील अतिक्रमण अखेर हटविले …                   

0
685
Shindkheda Chhatrapati Shivaji Maharaj Chauphuli finally removed...

शिंदखेडा -येथील छत्रपती शिवाजी महाराज चौफुली येथील अतिक्रमण नगरंचायतीच्या पथकानं बुधवारी दोन वाजता अतिक्रमण अखेर हटविले.यावेळी रस्त्याला अडथळा करणारी खोकी,टपऱ्या, अनाधिकृत पत्राशेड जेसीबीच्या सहाय्याने काढून टाकले.काही व्यापाऱ्यांनी विरोध करण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिस बंदोबस्त पाहून व्यापारी मागे हटले.

WhatsApp Image 2023 10 05 at 10.46.51 AM

            सदर भाजी मंडई व व्यापारी गाळे समोरील अतिक्रमण चिंतेचा विषय बनला होता.भाजी मंडईत अवजड वाहनांना पार्कींग तसेच ग्राहकांना,भाजी विक्रेत्यांना ये जा करण्यास रस्ता नसल्याने भाजी मंडई समोरील अतिक्रमण काढून जागा मोकळी करा नाहीतर आमचे पैसे परत द्या अशी तोंडी मागणी ओटे व गाळे धारकांनी कालच मुख्याधिकारी च्या दालनात केली होती. त्यासंदर्भातील बातमी आमच्या प्रतिनिधीने  कालच (दि.4-10-23 ) दिली होती आणि प्रसिद्धीस आल्यानंतर लगेच कारवाई सुरू झाल्यावर सर्वत्र बातमी चा दणका अशी चर्चा शहरात सुरू झाली. त्या अनुषंगाने व न्यायालयाच्या आदेशानुसार नगरपंचायत शिंदखेडा च्या वतीने सदर अतिक्रमण काढण्यात आले.भाजी मंडई समोरील नगर पंचायत मालकीचे पक्के बांधकाम असलेले पाच गाळे सोडून,मिलन हॉटेल पासून थेट प्रवीण साटोटे यांच्या दुकाना पर्यंतचे साधारण 12 दुकानाचे अतिक्रमण काढण्यात आले.

         अतिक्रमण निघाल्याने व्यावसायिकांमध्ये रोष व्यक्त केला जात आहे. आजच रस्त्यावर आल्याने आपली उपजीविका पुढे कशी चालणार या विचाराने सर्वत्र दुःखाचे सावट पसरले आहे.सदर अतिक्रमण काढू नये यासाठी त्यांनी कोर्टातून स्टे ची मागणी केली असून त्यावर अपेक्षित कारवाई अजूनही प्रलंबित आहे असे त्यांचे म्हणणे आहे.एकीकडे शिंदखेडा शहर काँग्रेसने भाजी मंडई व व्यापारी गाळे खुले करण्याची मागणी केली ती योग्यच परंतु आज अतिक्रमण निघाल्यामुळे आमच्यासारख्या गरीब लोकांचं नुकसान झालं आजच आम्ही रस्त्यावर आलो आमच्यासाठीही काही व्यवस्था करण्यात यावी अशा मागणीचा सूर निघत आहे. हयाकामी नगरपंचायत मुख्याधिकारी प्रशांत बिडगर व प्रशासकीय अधिकारी प्रल्हाद देवरे सह सर्व नगरपंचायत कर्मचारी तसेच पोलीस निरीक्षक दिपक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीसांचा चोख बंदोबस्त होता. तर विजवितरण कंपनी च्या कर्मचारीचे सहकार्य लाभले.

WhatsApp Image 2023 10 05 at 10.46.52 AM

नगरंचायत शिंदखेडा मालकीच्या भाजी मंडई ओटे व व्यापारी गाळ्यांचा लिलाव होऊन दोन महिने झाले असले तरी गणेशोत्सव व सलग सुट्ट्या पोलीस बंदोबस्त आदि कारणामुळे विलंब झाला असला आज अखेर अतिक्रमण काढले असुन येणाऱ्या आठ दिवसात सदर परिसर स्वच्छ करून अदयावत स्थगित ओटे व गाळेधारकांना व्यवसाय करण्यासाठी ताब्यात दिले जातील. ह्यामुळे व्यवसाय सुरळीत होईल व रहदारी पासुन शहरवासीयांचि सुटका होईल.प्रशांत बिडगर मुख्याधिकारी तथा प्रशासक नगरपंचायत शिंदखेडा

MD TV न्यूज शिंदखेडा प्रतिनिधी यादवराव सावंत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here