नंदुरबार :- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत इयत्ता १० वी १२ वी तसेच त्यानंतरच्या व्यावसायिक, बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी शासनाच्या सामाजिक न्याय विभागामार्फत भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सुरू करण्यात आली असून जे पात्र विद्यार्थ्यांनी दिनांक ३१ मार्च २०२३ पर्यंत अर्ज सादर केले नाहीत, अशा विद्यार्थ्यांसाठी अर्ज स्विकारण्याची दिनांक १४ जुलै, २०२३ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली असल्याची माहिती समाज कल्याण सहाय्यक आयुक्त देविदास नांदगांवकर यांनी दिली आहे.
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
हे सुध्दा वाचा
नंदुरबार पोलिसांनी रोखला अजून एक बालविवाह … पळून जावून विवाह करणाऱ्या अल्पवयीन मुला-मुलीचे केले समुपदेशन ! | MDTV NEWS
Nandurbar Police… कत्तलीसाठी बांधून ठेवलेल्या १२८ गोवंशाची केली सुटका…! | MDTV NEWS
या योजनसाठी सन २०२२-२३ या वर्षात पात्र विद्यार्थ्यांकडून दिनांक ३१ मार्च २०२३ पर्यंत अर्ज स्विकारण्यात आले होते. तथापि, अद्यापही जे पात्र विद्यार्थ्यांनी दिनांक ३१ मार्च २०२३ पर्यंत अर्ज सादर केले नाहीत, अशा विद्यार्थ्यांसाठी अर्ज स्विकारण्याची दिनांक १४ जुलै, २०२३ पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. यासाठी पात्र विद्याथ्यांनी त्यांचे परिपूर्ण अर्ज सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, नंदुरबार या कार्यालयास सादर करावेत, असे आवाहनही श्री.नांदगांवकर यांनी केले आहे.
एमडी.टीव्ही. न्युज ब्युरो, मुंबई.