शिंदखेडा : १०/३/२०२३
शिंदखेडा तालुक्यात अचानक वादळीवाऱ्यासह, गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे पिकांचे मोठे नुकसान झाले झालेले आहे.यात मका गहु हरभरा दादर ज्वारी केळी पपई आदी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले असुन शासनस्तरावर शेतीच्या पिकांचे पंचनामे महसूल व कृषी विभागाच्या संयुक्त रित्या करण्यात यावे तशा एकत्रित अहवाल शासनास सादर करावा.
शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास आलेला असताना अवकाळी पावसाने तो हिरावून घेतला आहे म्हणून शेतकरी हवालदिल झाला आहे.
शेतकरी आर्थिक संकटात सापडला असल्याने शेतकऱ्यांना त्वरित नुकसान भरपाई मिळावी अन्यथा शेतकरी संघर्ष समिती यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील शेतकरी जन आंदोलन करतील असा इशारा देण्यात आला.
सदर प्रत मा. तहसीलदार सो, यांच्या मार्फत मा. मुख्यमंत्री साहेब महाराष्ट्र राज्य यांना रवाना करण्यात आले. ह्यावेळी शेतकरी संघर्ष समितीचे तसेच पिक संरक्षण सोसायटीचे चेअरमन विजय नाना चौधरी व्हाय चेअरमन योगेश माधवराव देसले, संचालक अरुण चैत्राम पाटील, दिलीप आधार पाटील, बन्सीलाल पितांबर बोरसे, कैलास निंबा पाटील, दत्तात्रय जगन्नाथ देसले, अशोक राजाराम परदेशी, गजानन विश्वास भामरे, यादव प्रेमराज मराठे, विलास अर्जुन मोरे, मिनाबाई प्रकाश पाटील, इंदुबाई रमेश मराठे, गणपत देसले, उपस्थित होते.
संजय बडगुजर, सचिव मनोहर भामरे, राजेंद्र देसले, संतोष देसले, दिपक अहिरे, सुधाकर देसले उमेश राजपूत, रणजित राजपूत, बबन सकट, भुषण मराठे, आदींसह शेकडो शेतकरी सहभागी झाले होते.
आतापर्यंत सर्वच राजकीय पक्षांनी निदर्शने व तहसीलदार यांना निवेदन दिले आहे .
परंतु शेतकरी हितासाठी स्वतः शहरातील व तालुक्यातील शेतकरी एक संघ होऊन जन आंक्रोश मोर्चा काढून शासनाने तरी शेतकऱ्यांना दिलासा मिळावा अशी अपेक्षा आहे
.हया शेतकऱ्यांच्या मोर्चाने खरा कष्टकरी शेतकरी जागृत झाल्याचे चित्र दिसून आले.
यादवराव सावंत शिंदखेडा प्रतिनिधी एम डी टी व्ही न्यूज