व्यापाऱ्याची अशीही चालाखी अन शेतकऱ्यांची लूट..

0
420

नंदुरबार -७/४/२३

…चोप देताच दिली कबूली; भामट्याला केले पोलिसांच्या हवाली !

शेतकरी आणि व्यापारी यांचं एक वेगळंच नात असत…

एकमेकांवर विश्वास ठेवून दरवर्षी लाखोंचा व्यवहार या दोघांमध्ये सुरू असतो.
मात्र, भोळ्याभाबड्या शेतकऱ्यांचा अनेकवेळा विश्वासघात झाल्याच्या घटना या नात्याला काळीमा फासतात…अशीच घटना बोरिस (ता.शिंदखेडा ) गावात घडली. खाली गाडी भासवून गाडीसोबत दगडांचे वजन केले.

मात्र, ही बाब शेतकऱ्यांच्या निदर्शनात आली आणि त्यांनी या व्यापाऱ्याला चांगलाच चोप दिला.

घटनेची कबुली दिल्याने त्याला पोलिसांचा हवाली करण्यात आले. हा विषय संपूर्ण तालुक्यात चर्चेचा ठरला.

याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बोरिस गावात गेल्या अनेक वर्षांपासून व्यापारी वाणी व पाटील हे परिसरातील शेतकऱ्यांकडून कापूस खरेदी करीत होते.

यात रिकाम्या गाडीचे वजन करून नंतर कापूस भरून परत वजन काट्यावर नेत वजन केले जात असे. यात रिकामी गाडीचे वजन वजा जाता शिल्लक वजन कापसाचे धरून शेतकऱ्यांना पैसे देत असत.

मात्र, या व्यापाऱ्यांच्या मनात बेईमाईचे भूत शिरले आणि त्यांनी आपल्या नेहमीच्या व्यवहारातील शेतकऱ्यांची फसवणूक करण्याचे ठरविले. बोरिस गावातील एका शेतकऱ्याचा कापसाचा भाव ठरला.

खाली गाडी दाखवून वजन काट्यावर नेली.

मात्र या गाडीत सुमारे दोन ते तीन क्विंटल दगड भरून वजन केले. त्यानंतर रस्त्यात दगड फेकून दिला.गाडीत कापूस भरला व गाडी रवाना झाली.
मात्र हा प्रकार गावातील एका नागरिकाने पाहिला.

त्याला जेव्हा कळाले की या व्यापाऱ्याला गावातील माणसाने कापूस दिला

तेव्हा त्याने दगडाची कहाणी शेतकऱ्यांना फोन करून कथन केली.
त्यामुळे शेतकऱ्यांनी रामी फाट्यावर गाडी अडवून या व्यापाऱ्याला याबाबत जाब विचारला.
आधी त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली.

मात्र शेतकऱ्यांचा रोष पाहता आपले बिंग फुटल्याचे पाहून पळ काढण्याचा प्रयत्न केला.

त्यामुळे शेतकऱ्यांनी त्यास चांगलाच चोप देत पोलिसांच्या हवाली केले.

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती ! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/36S6BFu
कापूस किंवा इतर माल खरेदी विक्रीत अनेकवेळा शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याच्या घटना समोर येतात.

विश्वासातील व्यापारी शेतकऱ्यांना फसवू पाहतात.

त्यामुळे शेतकऱ्यांनी सावध राहता फसवणूक टाळावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

एम डी टी व्ही न्यूज ब्युरो ,नंदुरबार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here