भडगाव :२४/३/२३
चोपडा तालुक्यातील गुळ नदीवर मध्यम प्रकल्प तयार झाला ..
त्याच्या उजवा व डावा कालव्यासाठी सन २००८ मध्ये विरवाडे, वर्डी विष्णपूर आडगाव वडती चोपडा ,नारोद ,खरद ,अंबाडे व नरवाडे तरया गावातील 600 शेतकऱ्यांच्या शेतजमिनी कालवा वितरिकेसाठी अधिग्रहण करून आज सोळा वर्ष पूर्ण झालेत
मात्र प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना शासनामार्फत शेत जमिनीचा मोबदला मिळालेला नाही
त्याचा जाब विचारण्यासाठी जळगाव येथील तापी पाटबंधारे विकास महामंडळ च्या कार्यालयाला प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी व शेतकरी संघटनेने घेराव घालून आंदोलन केलं.
कार्यकारी संचालक श्रीयुत मंदाळे यांनी एक मे पर्यंत प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना शेत जमिनीच्या मोबदला निश्चित देऊ असं आश्वासन दिलं ..
तात्पुरता आंदोलन मागे घेतलं ..
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/36S6BFu
मात्र संबंधित प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना दहा मे च्या आत मोबदला न मिळाल्यास तापी पाटबंधारे विकास महामंडळाच्या कार्यालयातच सामूहिक आत्महत्या करणार असल्याचा इशारा निवेदनाच्या माध्यमातून देण्यात आला ..
सतीश पाटील,भडगाव प्रतिनिधी ,एम डी टी व्ही न्यूज