शिंदखेडा :७/३/२०२३
शिंदखेडा तालुक्यात दोन दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे विविध पिकांचं विविध भागात अतोनात नुकसान झालं.
पंचनामे दूरच, अधिकारी फिरकायला तयार नाहीत..
ही व्यथा ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची..
अवकाळी पावसामुळे हातात तोंडाचा घास हिरावून नेल्याने आधी शेतकरी चिंतातूर असताना कृषी आणि महसूल विभागांना त्वरित पंचनामे करण्याची आस आता शेतकऱ्यांना लागली आहे..
याबाबतचे निवेदन नुकताच त्यांनी शिंदखेडा तहसीलदार यांना दिलं..
नायब तहसीलदार बन्सीलाल वाडीले यांना निवेदनाच्या माध्यमातून पंचनामे लवकर करण्याची मागणी केली..
काँग्रेसचे तालुका जिल्हाध्यक्ष शामकांत सनेर यांच्या नेतृत्वाखाली प्रत्यक्ष पाहणी करून अधिकाऱ्यांनी पंचनामे करून नुकसान भरपाई प्रस्ताव सरकारकडे पाठवावा अशी मागणी केली..
यावेळी जिल्हाध्यक्ष शामकांत सनेर, तालुकाध्यक्ष अनंत पवार दीपक अहिरे ,शामकांत पाटील ,डॉक्टर कुरेशी ,प्रकाश पाटील ,दीपक देसले ,पांडुरंग माळी, हेमराज पाटील, अशोक बोरसे, दिनेश माळी ,निलेश देसले यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते..
शेतकरी देखील मोठ्या संख्येने या ठिकाणी होते..
आता नजरा लागल्या आहेत शेतकऱ्यांच्या कृषी आणि महसूल विभागाच्या हालचालींकडे..
यादवराव सावंत शिंदखेडा प्रतिनिधी एम.डी.टी.व्ही न्यूज