औषधी दुकानाला आग :लाखोचे नुकसान..

0
209

धुळे :१२/४/२३

तालुक्यातील वर्षी येथील काल दुपारच्या सुमारास औषधी दुकानाला शॉर्टसर्किटमुळे आग लागली होती.
याआगीत दुकानातील औषधी साहित्य जळून खाक झाले आहे
एक ते दीड तासानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे
आगीत साधारणतः पाच लाखाच्या पुढे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे
याप्रकरणी नरडाणा पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत आगीची नोंद करण्यात आलेली नव्हती.
वर्षी येथील रवींद्र जैन यांचे औषधी दुकान व किराणा असून ते सकाळी 11 च्या सुमारास औषधी दुकानात असताना त्यांना अचानक जळाल्याचा वास येऊ लागला त्यांना असे वाटले की बाहेर कुणीतरी काहीतरी कचरा जाळलेला असेल मात्र जळाल्याचा वास जास्त येत असल्याने ते वरच्या मजल्यावर गेले असता तेथे त्यांना आगीचे रौद्र रूप धारण केल्याचे दिसून आले
त्यांनी लागलीच आरडा ओरड केल्याने गावातील नागरिक तसेच त्यांचे भाऊ दिलीप जैन हे धावत आले
त्यांनी लगेच घराजवळ असलेल्या टूबवेल सुरू करून आगीवर पाणी मारण्याचा प्रयत्न केला.

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा https://bit.ly/3UoK7E0आणि जॉईनकरा.
पण आग आटोक्यात आली नाही,
गावातील नागरिकांनी शिरपूर-वरवाडे नगरपालिकेला फोन करून आगीची सूचना दिली
साधारणतः पाऊण तासात अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाले.
त्यानंतर शिंदखेडा येथुनही अग्निशमन दल गाडीसह दाखल झाले
दोन्ही अग्निशमनचा दलाने पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणली
घटनास्थळी वर्षीचे डी.आर पाटील , सरपंच सुरेश माळी आदी ग्रामस्थ उपस्थित होते
आगीत साधारणतः पाच लाखाच्या पुढे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.
यादवराव सावंत ,प्रतिनिधी ,शिंदखेडा ,एम डी टी व्ही न्यूज

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here